दिनांक २३.०३.२०२३ रोजी अश्विन मलिक मेश्राम फौंडेशनने चुनाभट्टीमध्ये शिवसेना कार्यालयात आयुष्यमान भारत हेअल्थ कार्डाचे शिबीर आयोजित केले होते
स्थानिकांनी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली दिसून आली.एकूण २५२जण लाभार्थी ठरले व त्यांना अश्विन मलिक मेश्राम फौंडेशनतर्फे विनामूल्य सेवा प्रदान करण्यातआली. श्रीमती शालिनी सुर्वे – महिला विभागप्रमुख शिवसेना कुर्ला विधानसभा यांच्या विनंतीला मान देत अश्विन मलिक मेश्राम फौंडेशनने आभा कार्डाचे शिबीर आयोजित करून समाजातील दुर्बल घटकांना निशुल्क सेवा दिली.
केंद्र शासनाच्या या आभा कार्डात लाभार्त्याची संपूर्ण माहिती डिजिटल स्वरूपात संग्रहित असते व क्यूआर कोड स्कॅन केल्याने पुन्हा प्राप्त करण्यात येते. या शिबिरात वी ये मयेकर ऑप्टिशियन्स यांच्या सहकार्याने मोफत नेत्र तपासणी सेवा लाभार्त्याना देण्यात आली.
संस्थापक अध्यक्ष अश्विन मलिक मेश्राम यांच्या मते,” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरु असलेला आभा प्रकल्प अतिशय उपयुक्त आहे व समाजातील सर्व घटकांनी याचा अवश्य लाभ घ्यावा” असे आवाहन केले.
सदर शिबीर फौंडेशनचे जन संपर्क अधिकारी- श्री विजय डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडले.