चेंबूर: कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक जयस्तंभ व जयस्तंभ परिसरात रखवालदार माळवदकर कुटुंबाने जे अतिक्रमण केलं आहे ते मुंबई उच्च न्यायालयात व पुणे दिवाणी न्यायालयात न्याय प्रविष्ठ प्रकरण असून हे अतिक्रमण नेमकं काय आहे व न्यायालय लढाई नेमकी काय आहे याची संपूर्ण माहिती आंबेडकरी समाजातील प्रत्येक माणसाला समजणे गरजेचे आहे. हा लढा समाजभिमुख होऊन त्याची जनजागृती निर्माण झाली तर हा लोक लढा उभा राहील यासाठी आंबेडकरी समाजातील सर्वांनी आपल्या तालुक्यात, जिल्ह्यात व शहरांत जनजागृती अभियान राबवावे आणि कोरेगाव भीमा येथील जयस्तंभ अतिक्रमण मुक्त करण्यास सहकार्य करावे असे आवाहन भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांनी कोरेगाव भीमा जयस्तंभ अतिक्र संविधानात्मक न्यायालय लढा या जनजागृती अभियानांतर्गत चेंबूर वाशी नाका येथे केले.
दादाभाऊ अभंग यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शिवशाही, शिवशाहीनंतर पेशवाई कशी आली व पेशवाई कशा प्रकारची अन्याय अत्याचार करीत होती याचा इतिहास सांगून भीमा कोरेगाव येथील जयस्तंभ व जयस्तंभ परिसराचा इतिहास सांगितला व त्या जागेवर कशाप्रकारे अतिक्रमण झाले हे सविस्तर सांगून या आंदोलनामध्ये आंबेडकरी चळवळीतील प्रत्येक व्यक्तीने येऊन हा लढा लढला पाहिजे कारण न्यायालयीन लढाई लढणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे आणि म्हणून प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यामध्ये हे जनजागृती अभियान राबवून हा लढा समाजभिमुख करण्यास आपण सर्वांनी सहकार्य करावे अशी विनंती उपस्थित धम्म बांधवांना केली.
चेंबूर येथील नागाबाबा नगरातील वैशाली बुद्ध विहारात जनजागृती अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी पंचशील घेवून कार्यक्रमाची सुरुवात केली. प्रास्ताविक कार्यक्रमाचे आयोजक महावीर कांबळे व मोहन सोनवणे यांनी केले. या अभियानाला तन मन आणि धनाने साथ देऊ असे रवी गायकवाड, विष्णू गायकवाड, उषाताई कापडणे, विशाल भेंडे, बंडू जाधव, गौतम हरिभाऊ पवार, जिजाबा निकाळजे, नामदेवराव साबळे व संतोष झेंडे यांनी प्रत्यक्ष कृतीतून केले.
कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते त्यात ॲड.निलेश भोसले, नामदेवराव साबळे, रवी गायकवाड, सुभाष साळवे, साहेबराव ससाने, हिरामण खंडागळे, अनिस भाई पठाण, सुनील यादव, सोपान खंडागळे गुरुजी, विष्णू गायकवाड, उषाताई कापडणे, वाय.आर. लोंढे, दिलीप इंगळे, बाळासाहेब आढांगळे, लक्ष्मण साळवे, दयाराम कांबळे, अनिल चंदनशिवे, सचिन कांबळे, सुनील अभंग, वैशालीताई जगताप, पल्लवीताई कांबळे, स्मिताताई अभंग आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महावीर कांबळे, उत्तम चोपडे, राजू साळवी, राजू जोगदंड, बबन लोंढे, संतोष पवार, अविनाश कांबळे, अविनाश काजळे, प्रभाकर धनवे, मच्छिंद्र माने, हर्षवर्धन वाठोरे, अशोक काळे, शांतीलाल कदम, महेंद्र वाघमारे, आनंद केदारे, प्रितेश कांबळे, प्रवीण भालेराव, दिलीप घोलप, श्रीकांत जगताप, कुंदन कांबळे, ऋषिकेश वाघमारे, निखिल कांबळे यांनी खूप मेहनत घेवुन मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धार्थ कॉलनी मधील तरुण कार्यकर्ते तृषभ आव्हाड, जयेंद्र गायकवाड, सुमेध गरुड व आकाश किरतकर यांनी सुद्धा परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आयोजक महावीर कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले व कार्यक्रमाचा समारोप केला.