मुंबई: कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक जयस्तंभ आणि जयस्तंभ परिसरात माळवदकर कुटुंबाने जे अतिक्रमण केले आहे व या जागेवर आणि व ऐतिहासिक जयस्तंभ ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू आहे त्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रमध्ये कोरेगाव भीमा जयस्तंभ अतिक्रमण संविधानात्मक न्यायालय लढा या माध्यमातून भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग वेगवेगळ्या ठिकाणी बैठका, सभा, कार्यक्रम घेत आहेत तसेच हा लढा अधिक तीव्र करण्यासाठी सामाजिक, राजकीय धार्मिक व विविध क्षेत्रातील नेते व कार्यकर्ते यांच्या गाठीभेटी घेत असून त्याचाच एक भाग म्हणून माता रमाई आंबेडकर महाविद्यालय (चिपळूण) चे संस्थापक अध्यक्ष आंबेडकरी चळवळीतील विचारवंत नेते भाई विवेक पवार यांची मुंबईतील त्यांच्या सांताक्रूझ येथील कार्यालयामध्ये भेट घेऊन भीमा कोरेगाव जयस्तंभ येथील अतिक्रमण व न्यायालय लढाई हे समजून सांगितले व त्यांना या लढ्याच्या माहितीचे निवेदन दिले. भाई विवेक पवार यांनी हा लढा गांभीर्यपूर्वक समजून घेतल्यानंतर त्यांनी या अस्मितेच्या न्यायालय लढाईमध्ये माझ्यासह माझे सर्व सहकारी पूर्णपणे तुमच्या सोबत असून जोपर्यंत कोरेगाव भीमाचा ऐतिहासिक जयस्तंभ हा आपल्या ताब्यात येत नाही तोपर्यंत विवेक पवार या न्यायालयीन लढाईमध्ये शेवटपर्यंत असेल असे सांगून या न्यायालय लढ्यामध्ये केवळ बोलणार नाही तर सोबत असेल आणि जिथे माझी गरज लागेल तिथे मी तुमच्यासोबत आहे असे रिपब्लिकन पक्षाचे नेते आंबेडकरी चळवळीचे विचारवंत भाई विवेक पवार यांनी सांगितले. भाई विवेक पवार यांनी या लढ्यात प्रत्यक्ष मैदानात उतरले असल्याने त्यांचे स्वागत करून आभार मानले.