मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या भिवंडीतील नेत्याने बौद्ध अल्पवयीन मुलाची केली हत्या…आम्ही बौद्ध तरुणांच्या हत्याच मोजायच्या का ??? दादाभाऊ अभंग

Share

भिवंडी: भिवंडीमधील बी एन एन कॉलेजच्या गेटवर दोन मुलांची बाचाबाची होऊन भांडण झालं याच भांडणाचा राग धरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचा भिवंडीतील नेता कैलास धोत्रे याने संकेत सुनील भोसले या सोळा वर्षे बौद्ध मुलाची हत्या केली. ही हत्या केवळ सत्तेच्या माजातून केली असून आपल्या पाठीमागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सागर बंगल्यावर चा बॉस आहे अशी भावना सध्या या शिवसेना आणि भाजपा या दोन पक्षांच्या नेत्यांकडून निर्माण झाली असल्याने बौद्ध तरुणांचं दिवसाढवळ्या हत्याकांड घडत आहेत. राज्यात रोज हत्याकांडाच्या घटना घडत असल्याने सरकार प्रायोजित हे कृत्य सुरू आहे की काय अशी शंका येत असून भिवंडी मध्ये ही तिसरी बौद्ध मुलाची हत्या झालेली आहे. बौद्ध मुलांच्या हत्या केवळ आम्ही मोजायच्या का? असा प्रश्न निर्णायक एल्गार चे संपादक दादाभाऊ अभंग यांनी सरकारला विचारला आहे
भिवंडी मध्ये संकेत सुनील भोसले व देवा कैलास धोत्रे या दोन मुलांची कॉलेजच्या गेटवर एकमेकाला धक्का लागला म्हणून वाद झाला या वादा मधून संकेत सुनील भोसले आणि देवा कैलास धोत्रे यांची मारामारी झाली. भांडण संपलं परंतु देवा धोत्रे या मुलानं त्याचे वडील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे भिवंडीतील नेता कैलास धोत्रे याला सांगितलं. कैलास धोत्रे आपले अनेक साथीदारांसह त्या कॉलेजच्या परिसरात आला आणि संकेत सुनील भोसले या सोळा वर्षाच्या बौद्ध मुलाचे अपहरण करून घेऊन गेला व आपल्या साथीदारांसह गंभीर मारहाण केली आणि बेशुद्ध करून टाकून दिलं. संकेत सुनील भोसले याला मारहाण झाल्यानंतर सुनील भोसले यांनी स्थानिक नारपोली पोलीस स्टेशनशी संपर्क साधला पण नारपोली पोलीस स्टेशननी कुठलीही दखल घेतली नाही किंवा प्रतिसाद दिला नाही. पोलिसांनी हे प्रकरण तात्काळ हाताळले असते तर संकेत सुनील भोसले याला जबरी मारहाण झाली नसती व त्याचा बळी गेला नसता असे संकेत याचे वडील संकेत सुनील भोसले यांनी सांगितले. संकेत याला जबरी मारहाण झाल्या नंतर त्याला मुंबईच्या के ई एम रुग्णालयात भोसले कुटुंबीयांनी दाखल केल्यानंतर त्याच्यावर उपचार झाले परंतु जबरी मारहाण झाल्याने २१ फेब्रुवारी २०२४ रोजी त्याचा मृत्यू झाला. हे जे हत्याकांड घडलेले आहे याच्यामागे खूप मोठे षड्यंत्र असून स्थानिक नारपोली पोलीस स्टेशनचे पोलीस सुद्धा त्याला जबाबदार आहेत असा आरोप सुनील भोसले यांनी केला आहे.
निर्णायक एल्गार चे संपादक दादाभाऊ अभंग यांनी रविवार दिनांक २५ फेब्रुवारी २०२४ रोजी संकेत सुनील भोसले यांचे वडील सुनील भोसले,आई व कुटुंबाची त्यांच्या राहत्या घरी भेट देऊन या कुटुंबाचे सात्वन केलं. यावेळी तृषभ आव्हाड, जयेंद्र गायकवाड, अनिल चंदनशिवे, आकाश किरतकर, कैलास शिराळ उपस्थित होते. दादाभाऊ अभंग यांनी या घटनेची सविस्तर माहिती घेतली आणि आता यापुढे आम्ही तुमच्या सोबत आहोत असे सांगून काही पण गरज लागल्यास कधी ही फोन करा असे भोसले कुटुंबाला आश्वासित केलं. भिवंडीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना व भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या माध्यमातून आतापर्यंत तीन बौद्ध तरुणांच्या हत्या झाल्या आहेत याला सर्वस्वी शिंदे फडणवीस आणि अजित पवारांचे सरकार जबाबदार असून त्यांच्या मार्गदर्शनाखालीच हे हत्याकांड घडवून आणले आहे. सर्व घटनेचा भोसले कुटुंब आणि स्थानिक नागरिकांनी निषेध करून आंबेडकरी समाजाने एकत्र यावं अशा प्रकारची भावना व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *