मुंबई : १ जानेवारी १८१८ रोजी कोरेगाव भीमा येथे ब्रिटिश आणि पेशवे यांच्यात युद्ध झाले व या युद्धात जुलमी, अन्यायी पेशवाईचा अंत झाला. या युद्धाचे स्मरण म्हणून कोरेगाव भीमा येथे जयस्तंभ बांधण्यात आला व तिथे रखवालदार म्हणून माळवदकर ठेवण्यात आला होता याच माळवदकर कुटुंबाने ऐतिहासिक जयस्तंभ आणि जयस्तंभ परिसरातील जागेवर अतिक्रमण केले असून त्या अतिक्रमणाच्या विरोधात भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग समितीच्या माध्यमातून न्यायालय लढाई लढत आहे. ही न्यायालयीन लढाई अत्यंत व्यवस्थित सुरू असताना ज्यांनी अतिक्रमण यांनी केलं त्या माळवदकर कुटुंबातील एका सदस्यांनी काही दिवसांपूर्वी जयस्तंभ आमची खाजगी मालमत्ता आहे अशा प्रकारचे विधान केले होते तर भीमा कोरेगांव येथे लढाई झाली नाही तर चकमक झाली असे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणारे पुस्तक लिहिले आहे. माळवदकर कुटुंबाच्या या कृत्यामुळे आंबेडकरी जनतेमध्ये मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे. कोरेगाव भीमा येथे लढाई झाली की नाही? जयस्तंभ नेमका कुणाचा? व १ जानेवारीला जयस्तंभ परिसरात प्रवेश करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी का घ्यावी लागते? हा न्यायालयीन खटला काय आहे? ही सर्व माहिती जाणून घेण्यासाठी अतिक्रमण विरोधात न्यायालयीन लढा लढणारे भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांचे व्याख्यान शनिवार दिनांक २ मार्च २०२४ रोजी सुभेदार रामजी मालोजी आंबेडकर सभागृह, झिग झॅग मित्र मंडळ, सिद्धार्थ कॉलनी, चेंबूर, मुंबई ४०००७१ येथे सायंकाळी ६.३० वाजता आयोजित केले असून आपल्या सर्वांचा अस्मितेचा व गंभीर हा विषय समजून घेण्यासाठी आंबेडकरी चळवळीतील समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन या लढ्यासाठी मैदानात उतरलेले सिद्धार्थ कॉलनी मधील युवा कार्यकर्ते तृषभ आव्हाड,जयेंद्र गायकवाड, आकाश किरतकर, सुमेध गरुड, राज त्रिभुवन, अक्षय देठे यांनी केले आहे. चेंबूर या परिसरातील सर्व आंबेडकरी चळवळीतील सामाजिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी केले आहे. या जनजागृती अभियान कार्यक्रमासाठी अनेक स्थानिक मंडळाचे पदाधिकारी, सभासद, तसेच वाय. आर. लोंढे, बाळराजे शेळके, महावीर कांबळे, अनिल चंदनशिवे व मोहन सोनवणे उपस्थित राहणार आहेत.