भीमा कोरेगाव जयस्तंभ अतिक्रमण या अस्मितेच्या विषयावर आंबेडकरी समाजाची उदासीनता भविष्यात धोकादायक ठरेल….. दादाभाऊ अभंग

Share

मुंबई : भीमा कोरेगाव जयस्तंभ आणि जयस्तंभ परिसरातील जागा ही आमच्या खाजगी मालमत्ता आहे असे जाहीरपणे माळवदकर कुटुंबातला एक सदस्य सांगतो आणि लाखों ने १ जानेवारीला भीमा कोरेगाव ला येणारे आंबेडकरी अनुयायी शांतपणे ऐकून घेतात याचा अर्थ त्यांना या विषयाची गंभीरता समजली नाही परंतु भीमा कोरेगाव जयस्तंभ अतिक्रमण हा विषय अत्यंत गंभीर बनत असून आपण या प्रकरणाकडे गांभीर्याने बघितले पाहिजे अन्यथा जयस्तंभाच्या बाबतीत असलेली उदासीनता ही भविष्यात धोकादायक ठरू शकते जर खरंच आपल्याला जयस्तंभ वाचवायचा असेल तर या अतिक्रमण न्यायालयीन लढ्यामध्ये प्रत्येकानी सामील व्हावं व हा समाजभिमुख लोक लढा उभा राहावा यासाठी जनजागृती अभियान कार्यक्रम आपल्या विभागामध्ये घेण्यात यावे असे आवाहन भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांनी चेंबूर येथे जनजागृती अभियान कार्यक्रमात केले.
१ जानेवारी १८१८ रोजी कोरेगाव भीमा येथे ब्रिटिश आणि पेशवे यांच्यात युद्ध झाले व या युद्धात जुलमी, अन्यायी पेशवाईचा अंत झाला. या युद्धाचे स्मरण म्हणून कोरेगाव भीमा येथे जयस्तंभ बांधण्यात आला व तिथे रखवालदार म्हणून माळवदकर याला ठेवण्यात आले होते. याच माळवदकर कुटुंबाने ऐतिहासिक जयस्तंभ आणि जयस्तंभ परिसरातील जागेवर अतिक्रमण केले असून त्या अतिक्रमणाच्या विरोधात भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग हे समितीच्या माध्यमातून न्यायालय लढाई लढत आहे. ही न्यायालयीन लढाई अत्यंत व्यवस्थित सुरू असताना ज्यांनी अतिक्रमण यांनी केलं त्या माळवदकर कुटुंबातील एका सदस्यांनी काही दिवसांपूर्वी जयस्तंभ आमची खाजगी मालमत्ता आहे अशा प्रकारचे विधान केले होते तर भीमा कोरेगांव येथे लढाई झाली नाही तर चकमक झाली असे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणारे पुस्तक लिहिले आहे. माळवदकर कुटुंबाच्या या कृत्यामुळे आंबेडकरी जनतेमध्ये मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे. कोरेगाव भीमा येथे लढाई झाली की नाही? जयस्तंभ नेमका कुणाचा? व १ जानेवारीला जयस्तंभ परिसरात प्रवेश करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी का घ्यावी लागते? हा न्यायालयीन खटला काय आहे? हे सर्व जाणून घेण्यासाठी अतिक्रमण विरोधात न्यायालयीन लढा लढणारे भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांचे व्याख्यान शनिवार दिनांक २ मार्च २०२४ रोजी सुभेदार रामजी मालोजी आंबेडकर सभागृह, सिद्धार्थ कॉलनी चेंबूर, मुंबई ४०००७१ येथे संपन्न झाले.
जनजागृती अभियान कार्यक्रमाची सुरुवात बौद्धाचार्य सुभाष कटारनवरे गुरुजी व भगवान जाधव गुरुजी यांनी धार्मिक विधी घेवून केली. जनजागृती अभियान कार्यक्रमाचे प्रास्ताविक या अभियानातील तळमळीने काम करणारे महावीर कांबळे यांनी केले. त्यांनी उपस्थितांना हे जनजागृती अभियान का आवश्यक आहे हे समजून सांगितले व प्रत्येक ठिकाणी असे कार्यक्रम घेण्यात यावे असे आवाहन केले.
वंचित बहुजन आघाडीचे बुलढाणा जिल्ह्यातील युवा नेते अतिशभाई खराटे, आंबेडकरी चळवळीतील सामाजिक नेत्या रमाताई अहिरे यांनी या अभियानास पाठिंबा देऊन हा लढा किती महत्वपूर्ण आहे ते सविस्तर सांगितले. कार्यक्रमास आंबेडकरी चळवळीचे युवा नेते बाळराजे शेळके, आंबेडकरी चळवळीचे लढावू नेते संजयदादा शिंदे, जनजागृती अभियान कार्यक्रमासाठी दिवसरात्र धडपड करणारे अनिल चंदनशिवे, आर. बी जगताप, गणेश प्रधान, चंदन कांबळे, कैलास शिराळ, जयंत बोधी, अमोल गायकवाड, आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमास राजू अहिरे, अनिल मोरे, वैभव सावंत, संदीप गवारे यांनी सहकार्य केले. या जनजागृती अभियानाची मुंबई मध्ये धुरा सांभाळणारे सिद्धार्थ कॉलनी मधील युवा आणि निष्ठावंत कार्यकर्ते तृषभ आव्हाड, जयेंद्र गायकवाड, आकाश किरतकर, सुमेध गरूड, राज त्रिभुवन, सुनील खैरनार यांनी जनजागृती अभियान कार्यक्रमासाठी खूप मेहनत घेतली. चेंबूर या परिसरातील सर्व आंबेडकरी चळवळीतील सामाजिक, राजकीय, धार्मिक, क्षेत्रातील उपस्थित बांधवांचे तृषभ आव्हाड, जयेंद्र गायकवाड, सुमेध गरुड, आकाश किरतकर यांनी आभार मानले.

मुंबई :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *