भीमा कोरेगाव येथे जयस्तंभ अतिक्रमण न्यायालय लढा जनजागृती अभियान औरंगाबाद येथे संपन्न …

Share

आंबेडकरी जनतेने न्यायालयीन लढ्याला साथ द्यावी…दादाभाऊ अभंग

औरंगाबाद: भीमा कोरेगाव येथे माळवदकर कुटुंबाने जयस्तंभ आणि जयस्तंभ परिसराच्या जागेवर कब्जा केला असून या अतिक्रमणाच्या विरोधात भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण आणि संवर्धन समिती न्यायालयीन लढाई लढत असून या न्यायालयीन लढ्याला आंबेडकरी जनतेने साथ द्यावी असे आवाहन भीमा कोरेगाव विजय स्तंभ संरक्षण व संवर्धन समिती अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांनी औरंगाबाद येथे उपस्थित जनसमुदायाला केले. भीमा कोरेगाव जागेची न्यायालयीन लढाई नेमकी काय आहे व या न्यायालयीन लढ्याची सद्यस्थिती काय आहे हे समजून सांगण्यासाठी भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण आणि संवर्धन समितीची अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांनी १४ जानेवारी नामविस्तार दिनानिमित्त जनतेशी संवाद साधून ही सर्व माहिती लोकापर्यंत पोहोचवली तसेच त्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच आंबेडकरी अनुयायांना आवाहन करण्यात आले की त्यांनी ही माहिती आपले नातेवाईक मित्रपरिवार आणि इतरांशी पाठवून त्यांना सुद्धा या न्यायालयीन लढ्या विषयी जागरूक करावं. औरगाबादमधील जनजागृती अभियानाला मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त सहभाग मिळाला पुढील जनजागृती अभियान २० मार्च महाड येथे संपन्न होणार असून आंबेडकरी जनतेने या जनजागृती अभियानाला साथ द्यावी अशी विनंती समितीतर्फे करण्यात आलेली आहे.
या जनजागृती अभियानाला डॉ. सिद्धांत गाडे, रिपब्लिकन नेते, औरंगाबाद जिल्हा परिषद सदस्य रमेश गायकवाड, पॅंथर सेनेचे सतीश पाटेकर ऑल इंडिया पँथर सेनेचे दीपक केदार, युथ दलित पँथरचे भाऊसाहेब जाधव, ॲड डी. व्ही. खिल्लारे, कैलास खिल्लारे आदी मान्यवरांनी भेट दिली. हे जनजागृती अभियान यशस्वी करण्यासाठी यश सिद्धी सैनिक सेवा संघाच्यावतीने प्रचंड मेहनत घेतली होती . अनिल डोंगरदिवे, लक्ष्मण म्हस्के, गंगाधर हिवाळे, प्रवीण खिल्लारे,आयु. भुजंग
आयु. शंकर हिवळेआतू. नागेश पायल,आयु बाबासाहेब घोडके, आयु. मदन बिबे,आयु. गणेश साळवे, आयु धममपाल कदम,आयु. श्रीमंत पांडव, आयु. बळी गजले तसेच भारतीय माजी सैनिक महार बटालियन यांनी मेहनत घेतली. विशेष मेहनत लक्ष्मण म्हस्के व गंगाधर हिवाळे यांनी घेतली. अभियानाचे आयोजन माजी सैनिक व यश सिद्धी सैनिक सेवा संघाचे प्रमुख अनिल डोंगरदिवे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *