रिपब्लिकन पक्षाच्या महामेळाव्यास राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच अनेक मान्यवर उपस्थित राहणार
मुंबई दि. ३१ – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेशचा भव्य मेळावा येत्या दिनांक ९ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता मुंबईत चुनाभट्टी येथील सोमय्या मैदानात आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार राहुल शेवाळे, खासदार पुनम महाजन, आमदार आशिष शेलार, आमदार प्रसाद लाड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष केन्द्रीय राज्यमंत्री मा.रामदासजी आठवले मेळाव्यास प्रमुख मार्गदर्शन करणार असून मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी रिपाइं चे मुंबई प्रदेश अध्यक्ष सिध्दार्थ कासारे उपस्थित राहतील अशी अधकिृत माहिती रिपब्लिकन पक्षातर्फे आज मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परषिदेत देण्यात आली.
या पत्रकार परषिदेस रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचटिणीस माजी राज्यमंत्री मा. अविनाश महातेकर, महाराष्ट्र राज्य सरचटिणीस मा.गौतम सोनवणे, मुंबई प्रदेश अध्यक्ष मा. सिद्धार्थ कासारे, मुंबई प्रदेश कार्याध्यक्ष मा. बाळासाहेब गरूड, मुंबई प्रदेश सरचिटणीस मा. विवेक गोविंदराव पवार, जिल्हा अध्यक्ष मा.साधू कटके, जिल्हा अध्यक्ष मा.संजय डोळसे; रमेश गायकवाड; प्रकाश जाधव; संजय पवार; कामु पवार; सचिनभाई मोहिते यांनी पत्रकार परषिदेत माहिती दिली.
येत्या दि. ९ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता चुनाभट्टी येथील सोमय्या मैदानात रिपब्लिकन पक्षाच्या महामेळाव्यास मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन रिपब्लिकन पक्षातर्फे करण्यात आले आहे. नागालँड विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे २ आमदार निवडून आल्याने रिपब्लिकन पक्षामध्ये चैतन्याचे वातावरण असून रिपब्लिकन कार्यकर्ते उत्साहाने मुंबई प्रदेशच्या मेळाव्यात रिपब्लिकन पक्षाचे शक्तप्रिदर्शन घडवतील असा विश्वास यावेळी रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केला.