डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा डोंबिवलीत जयंती महोत्सव…आज (रविवार) सायंकाळी ६.०० वाजता जयंती महोत्सव निमित्त प्रबोधन सभा….

Share

डोंबिवली: भारतीय वाल्मिकी समाज सेवाभावी संस्था या संस्थेच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३२ वा. जयंती महोत्सव डोंबिवली येथे साजरा होत असून या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय वाल्मिकी समाज सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेशभाई छापरवाल यांनी केली आहे.
रविवार दिनांक ३०/४२०२३ रोजी त्रिमूर्ती नगर येथे संस्थेच्या कार्यालयाच्या समोर सकाळी १०.०० वाजता धम्म ध्वजारोहण व धम्म पूजा पाठ होणार आहे. ११.०० वाजता भीम गीतांचा कार्यक्रम होणार असून सायंकाळी ६.०० वाजता इंदिरा गांधी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर डोंबिवली (पूर्व) येथे प्रबोधन सभा सायंकाळी ६.०० वाजता आयोजित करण्यात आली असून या प्रबोधन सभेचे अध्यक्ष व प्रमुख वक्ते म्हणून दादाभाऊ अभंग (साहित्यिक, राजकीय विश्लेषक व स्तंभलेखक) असून प्रमुख वक्ते म्हणून माननीय राजा वाल्मिकी राष्ट्रीय महासचिव यश फाउंडेशन हे असणार आहेत. कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष कविता छापरवाल तर सूत्रसंचालन सुनील चौहान करणार आहेत. आभार बी.आर. पंचागे मानणार आहे. कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर म्हणून खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रवींद्र चव्हाण, आमदार राजू रतन पाटील, कल्याण डोंबिवली जिल्हा अध्यक्ष व माजी नगरसेवक प्रल्हाद जाधव, शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे, स्वाभिमानी आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष लक्ष्मणराव अंभोरे, शिवसेना कल्याण तालुकाप्रमुख महेश पाटील, आरपीआय कल्याण डोंबिवली जिल्ह्याचे नेते माणिकराव उघडे, आर पी आय डोंबिवली जिल्ह्याचे युवा अध्यक्ष जय प्रल्हाद जाधव, रिपब्लिकन सेनेचे कल्याण डोंबिवली जिल्ह्याचे नेते आनंद नवसागरे, वंचित बहुजन आघाडीचे डोंबिवली पूर्व अध्यक्ष चंद्रकांत पगारे, लाल बावटा रिक्षा युनियनचे अध्यक्ष काळू कोमस्कर, आरपीआय कल्याण डोंबिवली महिला आघाडी जिल्हाध्यक्षा मीनाताई साळवे, आझाद समाज पार्टीचे डोंबिवली जिल्हा उपाध्यक्ष दामोदर काकडे, आरपीआय जिल्हा संघटक वसंत टेकाळे, आरपीआय कल्याण डोंबिवली जिल्हा संपर्कप्रमुख तुकाराम पवार, आर पी आय कल्याण डोंबिवली शहर उपाध्यक्ष किशोर मगरे, खजिनदार सिद्धार्थ रणपिसे, राष्ट्रीय जनता दलाचे उपाध्यक्ष शिवाजीराव मस्के, फेरीवाला युनियनचे नेते बबन कांबळे, वंचित चे डोंबिवली शहर माजी अध्यक्ष सुरेंद्र ठोके, एडवोकेट मिलिंद साळवे, भारतीय बौद्ध महासभा डोंबिवली शहर माजी अध्यक्ष गौतम सुतार, आर पी आय चे डोंबिवलीचे सामाजिक कार्यकर्ते जिजाभाऊ गोंडगे, रिक्षा युनियनचे नेते बारकु गुंजाळ, वंचीतचे राहुल सावंत, स्वाभिमानी आर पी आय चे कार्यालय प्रमुख राजू दोंदे इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार असून प्रबोधन सभेसाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय वाल्मिकी समाज सेवाभावी संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *