डॉ.बालाजी किणीकर यांना शिवसेनेची उमेदवारी…उद्या मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार….

Share


अंबरनाथ : महाराष्ट्राचे कार्यकुशाल मुख्यमंत्री मा. श्री.एकनाथजी शिंदे यांच्या आशीर्वादाने तसेच कल्याण लोकसभेचे खासदार डॉ.श्रीकांतजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाने मंगळवार दि.२९ ऑक्टोबर २०२४ सकाळी ०९.३० वा. आमदार डॉ. बालाजी किणीकर यांचे नामनिर्देश पत्र दाखल करण्यात येत असून महायुतीचे सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, महिला आघाडी, युवासेना, युवतीसेना, तसेच सर्व कार्यकर्ते यांनी हुतात्मा चौक , अंबरनाथ (पूर्व) येथे दाखल व्हावे असे आवाहन शिवसेनातर्फे करण्यात आले आहे. यावेळी गोपाळ लांडगे (कल्याण जिल्हाप्रमुख), सौ.विजयाताई पोटे (उपनेत्या), सौ छायाताई वाघमारे (महिला जिल्हा संघटक, कल्याण.), श्री. अरविंदजी वाळेक (शहरप्रमुख, अंबरनाथ),श्री.राजेंद्र चौधरी (महानगर प्रमुख, उल्हासनगर), श्री. सुनिल चौधरी (मा. नगराध्यक्ष, संपर्क प्रमुख,जळगाव) उपस्थित राहणार आहेत. आपण सर्वांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित राहावे अशी विनंती करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *