(अंबरनाथ) अंबरनाथ, अंबरनाथ अतिरिक्त एमआयडीसीमध्ये अनेक कंपन्यांनी अनाधिकृत बांधकामे व अतिक्रमणे केलेली असून एमआयडीसीच्या जागेमध्ये अनाधिकृत हॉटेल्स, दुकाने, गॅरेज टपऱ्या व इतर छोटी मोठी अनाधिकृत बांधकामे केली आहेत यावर कारवाई करण्यात यावी अशा प्रकारचा पत्रव्यवहार अनेक वेळा मंत्रालयात तसेच कार्यकारी अभियंता अंबरनाथ यांच्याकडे करण्यात आला होता मंत्रालयातून आदेश आले तरी अंबरनाथचे कार्यकारी अभियंता यांनी कुठलीही कारवाई न केल्या कारणामुळे महाराष्ट्राचे उद्योग मंत्री श्री उदय सामंत यांच्याकडे पुन्हा पत्र व्यवहार करून अनाधिकृत बांधकामे, अतिक्रमणे तोडण्यात यावी व याला संरक्षण देणाऱ्या सबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशा प्रकारचे मागणी पत्राद्वारे महाराष्ट्राचे उद्योग मंत्री मा.ना. उदय सामंत यांच्याकडे करण्यात आली होती. मा. मंत्री यांनी सदर पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी (महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ) यांना कारवाईसाठी पाठवण्यात आले होते. त्यानंतर हा अर्ज प्रादेशिक क्षेत्रीय कार्यालय ठाणे यांच्याकडे कारवाईसाठी पाठवण्यात आला होता. प्रादेशिक कार्यालयाने हा अर्ज अंबरनाथ औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता यांना कारवाईसाठी पाठवला पण त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही. म्हणून या अर्जावर काय कारवाई करण्यात आली अशा प्रकारचे माहिती अधिकाराखाली माहिती मागितली आली तेव्हा माहिती तर दिलीच नाही परंतु ती उपविभागाकडे पाठवून कार्यकारी अभियंता यांनी माननीय नामदार उद्योग मंत्री उदय सावंत यांच्या आदेशाला केराची टोपी दाखवली. अंबरनाथ विभागामध्ये अनेक वेळा अनाधिकृत बांधकाम व अतिक्रमणाची माहिती अधिकाराखाली माहिती मागितली सुरवातीला माहिती दिलीच नाही मग अपील केल्यावर जन माहिती अधिकारी यांनी खोटी, चुकीचं व अर्धवट माहिती दिली. खोटी माहिती देतात म्हणून जर अपिलीय अधिकारी कार्यकारी अभियंता यांच्याकडे अपील केल्यानंतर त्यांनी आदेश देऊन सुद्धा जन माहिती अधिकारी माहिती देत नाहीत अशा प्रकारचा अंबरनाथ एम आय डी सी विभागामध्ये अंनागोंदी कारभार चालू आहे. अंबरनाथ, अंबरनाथ अतिरिक्त एम आय डी सी मधील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमण तोडण्यासाठी राज्यपाल मुख्यमंत्री व उद्योग मंत्री यांना पत्र पाठवून अनाधिकृत व अतिक्रमणे बांधकामे तोडण्यात यावी व या बांधकामांना संरक्षण देणाऱ्या सबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.