सुरेश जगताप/डोंबिवली :
हेडूटणे परिसरात पलावा सिटी म्हणून बराच विकसीत झाला मात्र परिसरातील भूमिपुत्र शेतकऱ्याच्या जमीनी विकत घ्यायच्या आणि त्यांना त्यांचा मोबदला न देता गरीब गरजु शेतकऱ्यावर अन्याय करायचा असा काहीसा प्रकार मोठ्या प्रमाणावर उघड होताना दिसत आहे. बौद्ध समाजातील मंगेश जाधव ह्यांनी लोढा बिल्डर ह्यास स्वताची जागा विकसित करणेसाठी दिली होती. मंगेश जाधव हे त्यांचा हिस्सा मागण्यासाठी लोढा यांच्याकडे गेले असता, त्यांनी मंगेश जाधव यांच्यावर खुनाचा प्रयत्न करण्याचा खोटा गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी गुन्ह्याचा तपास केल्यानंतर सदर गुन्ह्यात मंगेश जाधव यांचा काहीही संबंध नाही असा निष्कर्ष काढला.
त्यामुळे लोढा यांनी मंगेश जाधव यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे हे सिद्ध झाले आहे. अनुसूचित जातीचे सदस्यांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना त्रास देणे म्हणजे अनुसूचित जाती जमाती (अन्याय अत्याचार प्रतिबंधक) कायद्यानुसार गुन्हा आहे.
जेव्हा Atrocity Act कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करणे साठी मंगेश जाधव गेले असता, आरोपींना कायदेशीर शिक्षेपासून वाचवणे साठी कल्याण परिमंडळ तीन चे पोलीस उप आयुक्त सचिन गुंजाळ हे गुन्हा दाखल करून घेत नाहीत तसेच मंगेश जाधव यांनी लोढा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करणे साठी प्रयत्न चालू असल्यामुळे मंगेश जाधव यांच्यावर लोढा यांच्या हस्तकांनी 3 वेळा हल्ला करण्याचा प्रयत्न केला, तरी देखील गुन्हा दाखल होत नसलेमुळे पोलिस उप आयुक्त सचिन गुंजाळ यांच्या विरुध्द 15/10/2024 रोजी सकाळी 10.30 वाजता अपर पोलीस आयुक्त कल्याण यांच्या कार्यालया समोर एकदिवसीय धारना आंदोलन करणार आहे अशी माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दीपक निकाळजे गटाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष मंगेश जाधव यांनी मिडिया समोर व्यक्त केले आहे.
तरी सर्व पक्षीय संघटनांनी या धारना आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.