खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात तिसरा उमेदवार??? तिसऱ्या उमेदवाराच्या मागील अदृश्य शक्ती कोण? मतदारसंघात चर्चा….

Share

खेड : पाच वर्षे विरोध करणारे ऐन निवडणुकीत आपली भुरटेगिरी करतात व उखळ पांढरे करून घेतात.खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात तिसरा उमेदवार असेल तर दिलीप मोहिते पाटील यांना विजय सोपा जातो व थेट लढत झाली तर आमदार दिलीप मोहिते यांना निवडणूक अवघड जाते हा इतिहास बघता दिलीप मोहिते यांच्या विरोधकांनी दिलीप मोहिते यांना पराभूत करण्यासाठी निवडणूक जाहीर होण्यापूर्वी शपथा घेतल्या असल्या तरी पट्टीचे राजकीय खेळाडू असलेल्या मोहिते यांनी विरोधकांत फूट पाडून तिसरा उमेदवार देण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. पाच वर्षे दिलीप मोहिते यांना विरोध करणारे निवडणुकीच्या काळात दिलीप मोहिते यांच्या पुढे लोटांगण घालतात हा या मतदारसंघाचा मागील वीस वर्षाचा इतिहास राहिला आहे. जर विरोधकांनी एकास एक उमेदवार दिला नाही तर पुन्हा एकदा दिलीप मोहिते यांचा विजय पक्का आहे अशी काही समजूत जर मोहिते समर्थकांची असली तरी यावेळी खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात परिवर्तन अटळ आहे अशी मतदारसंघात चर्चा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *