मुंबई: आंबेडकरी चळळीतील अग्रगण्य सामाजिक कार्यातील नेते दिवंगत एकनाथ दादा अवसरमोल यांच्या सहचारिणी शांताबाई एकनाथ अवसरमोल यांचे दिनांक १२ फेब्रुवारी २०२३ रोजी दुःखद निधन झाले. शांताबाई एकनाथ अवसरमोल यांचा जन्म २५ डिसेंबर १९३७ मध्ये अकोला जिल्ह्यातील चींचाब्या या गावी झाला. त्यांचा मंगल परिणय सामाजिक चळवतील अग्रणी नेते एकनाथ दादा अवसरमोल यांच्याशी झाला..एकनाथ दादा गावातून मुंबईत आले तर शांताबाई या मुंबईत च राहत होत्या. दोघांचा संसार मुंबई मध्ये सुरू झाला. शांताबाई यांनी एकनाथ दादांना सुरुवातीपासूनच भक्कम पाठिंबा दिला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्या एकनाथ दादांच्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या राहिल्या, त्यांनी आपला संसार सांभाळत एकनाथ दादांच्या प्रत्येक सामाजिक कार्यातील कृतीला समर्थन व साथ दिली. आपल्या संसाराची परवड शांता कशी सांभाळते हे एकनाथ दादांना माहीत होते पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्यासाठी इतके केले आहे की त्याची परतफेड आपल्या लाखों पिढ्या करू शकत नाही पण निदान त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालावे व आंबेडकरी चळवळीत काम करून जे शक्य आहे ते काम करावे असा मानस एकनाथ दादांचा होता व तो त्यांनी शेवटपर्यंत ठेवला. शांताबाई यांनी संसार सांभाळत असताना मुलांच्या शिक्षणाला खूप महत्व दिले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा विचार शांताबाई यांच्या डोक्यात होता व याच विचारांनी त्यांनी आपली मुले उच्च शिक्षित केली. त्यांची चार ही मुले मोठ्या पदावर काम करीत आहे. त्यांची मोठी मुलगी करुणा लोखंडे या Adminisrative Officer झाल्या, पुर्णिमा या सिनियर एअरपोर्ट होस्टेस बनल्या, चंद्रमणी (अनंता) हे Assistant commissioner (Income tax), धर्मेंद्र ( मिलिंद) हे मॉर्गन स्टॅन्ली USA VP आहे, मिलिंद अवसरमोल हे जागतिक स्तरावर आंबेडकरी विचारांचा प्रचार आणि प्रसार करतात व ते चांगले अभ्यासक आणि व्याख्याते आहेत. भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण मालकी हक्क या न्यायलायिन लढाई मध्ये ते सुरवातीपासून अग्रेसर असून समितीचे सल्लागार म्हणून मार्गदर्शन करतात. कामगार नेते प्रकाश लोखंडे हे जावई असले तरी एकनाथ दादा आणि शांताबाई या दाम्पत्यांनी त्यांना कधी ही जावई न समजता आमचा मोठा मुलगा आहे असे ते सांगत व आयुष्यभर हेच नाते जपले. ते युनियन बँक मध्ये DGM म्हणून सेवानिवृत्त झाले असून ते आंबेडकरी चळवळीत सक्रीय काम करीत आहे. शांताबाई या घर, कुटुंब, नातेवाईक, व चळवळीतील इतर लोकांशी त्या अत्यंत विनम्र पणे बोलत असे… कुणाच्याही सुखदुःखात त्या तातडीने मदत करीत असे. शांताबाई ह्या अत्यंत शांत, सुसंस्कारित आणि लढाऊ होत्या. सुरुवातीपासूनच आई-वडिलांचे चांगले संस्कार लाभल्यामुळे लोकांशी कसं बोलायचं कसं वागायचं हे त्यांना चांगलं माहीत होतं आणि म्हणूनच त्यांनी आपल्या मुलांना अत्यंत चांगलं सूसंस्कृत केलं आणि याचेच फळ म्हणजे आज त्यांची चारही मुलं उच्च शिक्षित आणि पदावर आहेत. शांताबाई अवसरमोल यांनी कुटुंबाचा सांभाळ करीत असताना त्यांचं सामाजिक चळवळीमध्ये मोठे योगदान आहे. एकनाथ दादा यांचे सामाजिक चळवळीतील योगदान आणि त्यांची तळमळ पाहून शांताबाई अवसरमोल यांनी एकनाथ दादा यांना सतत पाठिंबा दिला. त्यांच्या दुःखद निधनाने अवसरमोल कुटुंबाची च नाही तर आंबेडकरी समाजाची मोठी हानी झाली आहे. शांताबाई एकनाथ अवसरमोल यांच्यापाठी जावई प्रकाश लोखंडे, मुलगी करुणा प्रकाश लोखंडे, मुलगी पुर्णिमा, मुलगा चंद्रमणी आणि सून वैशाली चंद्रमणी अवसरमोल, मुलगा धर्मेंद्र (मिलिंद) व सून नंदिता मिलिंद अवसरमोल, व नातवंडे असा मोठा परिवार आहे.
दिवंगत शांताबाई एकनाथ अवसरमोल यांचा पुण्यानुमोदन कार्यक्रम रविवार दिनांक १९/२/२०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता व्ही. बँक्वेट अँड लॉन, 9 W. T. पाटील मार्ग, ड्यूक फॅक्टरी पाठीमागे गोवंडी, मुंबई ४०००८८ येथे संपन्न होणार असून आपण सर्वांनी उपस्थित राहावे अशी विनंती अवसरमोल परिवाराने केली आहे.