शांताबाई एकनाथ अवसरमोल यांचे दुःखद निधन… पुण्यानुमोदन कार्यक्रमाचे रविवारी आयोजन..

Share

मुंबई: आंबेडकरी चळवळीतील अग्रगण्य सामाजिक कार्यातील नेते दिवंगत एकनाथ दादा अवसरमोल यांच्या सहचारिणी शांताबाई एकनाथ अवसरमोल यांचे दिनांक १२ फेब्रुवारी २०२३ रोजी दुःखद निधन झाले. शांताबाई एकनाथ अवसरमोल यांचा जन्म २५ डिसेंबर १९३७ मध्ये अकोला जिल्ह्यातील चींचाब्या या गावी झाला. त्यांचा मंगल परिणय सामाजिक चळवळीतील अग्रणी नेते एकनाथ दादा अवसरमोल यांच्याशी झाला..एकनाथ दादा गावातून मुंबईत आले तर शांताबाई या मुंबईतच राहत होत्या. दोघांचा संसार मुंबई मध्ये सुरू झाला. शांताबाई यांनी एकनाथ दादांना सुरुवातीपासूनच भक्कम पाठिंबा दिला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्या एकनाथ दादांच्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या राहिल्या, त्यांनी आपला संसार सांभाळत एकनाथ दादांच्या प्रत्येक सामाजिक कार्यातील कृतीला समर्थन व साथ दिली. आपल्या संसाराची परवड शांता कशी सांभाळते हे एकनाथ दादांना माहीत होते पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्यासाठी इतके केले आहे की त्याची परतफेड आपल्या लाखों पिढ्या करू शकत नाही पण निदान त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालावे व आंबेडकरी चळवळीत काम करून जे शक्य आहे ते काम करावे असा मानस एकनाथ दादांचा होता व तो त्यांनी शेवटपर्यंत ठेवला. शांताबाई यांनी संसार सांभाळत असताना मुलांच्या शिक्षणाला खूप महत्व दिले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा विचार शांताबाई यांच्या डोक्यात होता व याच विचारांनी त्यांनी आपली मुले उच्च शिक्षित केली. त्यांची चार ही मुले मोठ्या पदावर काम करीत आहे. त्यांची मोठी मुलगी करुणा लोखंडे या Adminisrative Officer झाल्या, पुर्णिमा या सिनियर एअरपोर्ट होस्टेस बनल्या, चंद्रमणी (अनंता) हे Assistant commissioner (Income tax), धर्मेंद्र ( मिलिंद) हे मॉर्गन स्टॅन्ली USA VP आहे, मिलिंद अवसरमोल हे जागतिक स्तरावर आंबेडकरी विचारांचा प्रचार आणि प्रसार करतात व ते चांगले अभ्यासक आणि व्याख्याते आहेत. भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण व मालकी हक्क या न्यायलायिन लढाईमध्ये ते सुरवातीपासून अग्रेसर असून समितीचे सल्लागार म्हणून मार्गदर्शन करतात. कामगार नेते प्रकाश लोखंडे हे जावई असले तरी एकनाथ दादा आणि शांताबाई या दाम्पत्यांनी त्यांना कधी ही जावई न समजता आमचा मोठा मुलगा आहे असे ते सांगत व आयुष्यभर हेच नाते जपले. ते युनियन बँक मध्ये DGM म्हणून सेवानिवृत्त झाले असून ते आंबेडकरी चळवळीत सक्रीय काम करीत आहे. शांताबाई या घर, कुटुंब, नातेवाईक, व चळवळीतील इतर लोकांशी त्या अत्यंत विनम्र पणे बोलत असे… कुणाच्याही सुखदुःखात त्या तातडीने मदत करीत असे. शांताबाई ह्या अत्यंत शांत, सुसंस्कारित आणि लढाऊ होत्या. सुरुवातीपासूनच आई-वडिलांचे चांगले संस्कार लाभल्यामुळे लोकांशी कसं बोलायचं कसं वागायचं हे त्यांना चांगलं माहीत होतं आणि म्हणूनच त्यांनी आपल्या मुलांना अत्यंत चांगलं सूसंस्कृत संस्कार दिले आणि याचेच फळ म्हणजे आज त्यांची चारही मुलं उच्च शिक्षित आणि पदावर आहेत. शांताबाई अवसरमोल यांनी कुटुंबाचा सांभाळ करीत असताना त्यांचं सामाजिक चळवळीमध्ये मोठे योगदान आहे. एकनाथ दादा यांचे सामाजिक चळवळीतील योगदान आणि त्यांची तळमळ पाहून शांताबाई अवसरमोल यांनी एकनाथ दादा यांना सतत पाठिंबा दिला. त्यांच्या दुःखद निधनाने अवसरमोल कुटुंबाची च नाही तर आंबेडकरी समाजाची मोठी हानी झाली आहे. शांताबाई एकनाथ अवसरमोल यांच्यापाठी जावई प्रकाश लोखंडे, मुलगी करुणा प्रकाश लोखंडे, मुलगी पुर्णिमा, मुलगा चंद्रमणी आणि सून वैशाली चंद्रमणी अवसरमोल, मुलगा धर्मेंद्र (मिलिंद) व सून नंदिता मिलिंद अवसरमोल, व नातवंडे असा मोठा परिवार आहे.
दिवंगत शांताबाई एकनाथ अवसरमोल यांचा पुण्यानुमोदन कार्यक्रम रविवार दिनांक १९/२/२०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता व्ही. बँक्वेट अँड लॉन, 9 W. T. पाटील मार्ग, ड्यूक्स फॅक्टरी पाठीमागे, गोवंडी, मुंबई ४०००८८ येथे संपन्न होणार असून आपण सर्वांनी या पुण्यानुमोदन कार्यक्रमास उपस्थित राहावे अशी विनंती अवसरमोल परिवाराने केली आहे.

6 thoughts on “शांताबाई एकनाथ अवसरमोल यांचे दुःखद निधन… पुण्यानुमोदन कार्यक्रमाचे रविवारी आयोजन..

  1. खूपच विस्तृत माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  2. A beautiful example of how a mother can educate her enter family.

    भावपूर्ण श्रद्धांजली.

  3. सर्वांना जयभीम,
    कालकथीत शांताताई अवसरमोल यांचे आकस्मिक निधन आमच्या सबंध अणुशक्तिनगर वासियांसाठी अत्यंत दुखंद घटना आहे. परिवारातील एक महत्त्वाचा मार्गदर्शक सदस्य हरपला. त्या आदर्श समाजीक कार्यकरत्या होत्या. आमच्या सारखे अनेक सामाजिक कार्यकर्ते त्यांनी घडवले .लुम्बिनीवन बुद्ध विहार अणुशक्तिनगर येथील त्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या ज्यांच्या अध्यक्षतेखाली महिलांनी पहिली आंबेडकर जयंती व पहिली माहामातांची जयंती साजरी केली . त्यांच्या जाण्यामुळे एक सामाजिक पोकळी निर्माण झाली आहे.

  4. वैचारिक जान असलेल्या आईचे दु:खद निधन हे मनाला चटका लावून जाते. ज्यांनी प्रतिकुल परिस्थितीत मुलांना योग्य दिशा दिली. त्या आज शरीराने नसल्या तरी त्यांच्या कार्याची प्रेरणा नेहमी च आमच्या सोबत असेल. त्यांना भावपूर्ण आदरांजली.

  5. Awasarmol family is great social worker and cooperative nature it’s proud of me i am inspired from his character.

    Jaibhim

  6. जयभीम साहेब
    आज आई चे पुण्यतिथीस येेणे शक्य नाही. माझे विचार व्यक्त करतो अवसरमल फॅमिली सोबत माझे तर आयु. सुरवाडे(IDBI) हे माझे फॅमिली व सामाजिक जुने सहकारी त्या माध्यमातून अवसरमल फॅमिली ची माहीती तर आयु. लोखंडे मॅडम(BARC) शी संपर्क यायचा तर त्याचा मुलगा व माझा मुलगा मित्रच तर मॅडम ची लहान बहीण अंधश्रद्धा निर्मुलन समिती काम करतात त्याचा प्रतेक कार्यक्रमात मी सोबत आयु. उरकुडे साहेब संपर्क यायचा तर आता गृप वरून मॅसेज मिळतात. तर आयु. लोखंडे साहेब नी मी सतत नेहमीच कार्यक्रमा निमित्त भेटत असतो. तर मी आयु राजू कांबळे सर यांचे सोबत काम करत असतांना आयु. मिलिंद अवसरमल यांचे कार्य नाशिक या USA सतत उल्लेख होत असे तरी पण आई आयु. शांताबाई एकनाथ अवसरमल मला फार जवळच्याच वाटतात त्याच्यात असलेली MATURITY.
    कधी ही मोठेपण दाखविले नाही तर लहान मोठ्याशी आदराने आणी प्रेमाने बोलले त्यामुळेच त्या तरी निरंतर माझ्या आठवणीत राहातील.
    आई अवसरमल यांना
    शरद हजारे व परिवाराचे(सीवूड) वतीने भावपूर्ण आदरांजली 💐💐💐जयभीम-नमो बुद्धाय 🙏🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *