आज व उद्या मुंबईत धम्म पद यात्रेचे भव्य स्वागत..धम्म बांधवांनी, भगिनींनी उपस्थित राहण्याचे संयोजकांकडून आवाहन

Share


आंबेडकरी चळवळीतील सर्व गटातटातील पक्ष, संघटनेतील हेवेदावे बाजूला ठेवून सन्माननीय नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी, मुंबई शहरातील सरकारी, निमसरकारी कार्यालयातील बांधवांना, भगिनींना, मातांना, कळकळीची विनंती करतो कि, आपल्या हातातील रोजची कामे दोन दिवसासाठी बाजूला ठेवून… दिनांक
14 फेब्रु.2023 मंगळवार आणि
15 फेब्रु. 2023 बुधवार रोजी मुंबई शहरा
मध्ये
तथागत भगवान बुद्धांच्या पवित्र अस्थीधातूंचे दर्शन होणार आहे.
तथागत भगवान बुद्धांच्या पवित्र अस्थीधातूंच्या दर्शनाचा लाभ महाराष्ट्र राज्यातील बौद्ध उपासकांना होण्यासाठी थायलंड मधून आलेल्या बौद्ध भन्ते यांनी परभणी ते चैत्यभूमी अशी धम्म पदयात्रा काढली असून या धम्म पदयात्रेचा समारोप येत्या दि.15 फेब्रुवारीला मुंबईत चैत्यभूमी येथे होत आहे. या धम्म पदयात्रेत थायलंडमधून आणलेल्या भगवान बुद्धांच्या पवित्र अस्थीधातूंचे दर्शन मुंबईतील जनतेला होणार असून या दर्शनाचा लाभ घेण्यासाठी आणि पूज्य भिक्खू संघाच्या स्वागतास….

कार्यकर्त्यांनी आणि आंबेडकरी जनतेने बौद्ध उपासक उपासिकांनी धम्म पदयात्रेच्या स्वागतासाठी मंगळवारी दिनांक १४ फेब्रुवारी रोजी सकाळी 9:30 वा. मुलुंड चेकनाका ते सायं. 4:00 वा. रमाबाई आंबेडकर पुतळ्या जवळ, घाटकोपर, डि. बी. पवार स्कूल मैदान येथे मुक्काम. होणार आहे तिथे भिक्खू संघ धम्मदेसना देणार आहेत. दि.15 फेब्रु.2023 बुधवार रोजी सकाळी 8:00 वा. घाटकोपर कामराज नगर जूना RTO , ९ अमर महल, १० .०० वाजता श्रमजीवी नगर, १०.३० सिद्धार्थ कॉलनीं, ११ am सुमन नगर प्रियदर्शनी सायन माटुंगा, १२-३० दादर सर्कल, भव्य स्वागत दुपारी 1:30 वा. दादर चैत्यभूमि येथे होणार असून धम्मदेसना होऊन समारोप होईल. या धम्म रॅलीत धम्मबांधवांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक सिद्धार्थ हत्तीअंबीरे, सयोजक गगन मलिक, रमेश कांबळे मुख्य समन्वक मुंबई यांनी केले आहे तरी मुंबईत आलेल्या बुद्ध धम्मपद यात्रेचे स्वागत करुन पवित्र अस्थींचे दर्शन घेवून थायलंड वरून आलेल्या भिक्खू संघाचे स्वागत करण्यात यावे असे मुख्य संयोजक सिद्धार्थ हत्तीअंबिरे व मुंबई समन्वयक रमेश कांबळे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *