मुंबई: थायलंड येथून आणलेल्या विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा पवित्र अस्थीधातू कलश घेवून भंते संघ धम्मपद यात्रेच्या माध्यमातून परभणी तें चैत्यभूमी असा प्रवास करत असताना या वाटेवर लाखों लोक ( धर्म, जात, पंथ, राजकीय, सामाजिक हेवेदेवे विसरून ) सहभागी होत अभिवादन करत होते. दिनांक १७ जानेवारी २०२३ रोजी परभणी येथून सुरु झालेली हीं पदयात्रा १५ फेब्रवारी २०२३ रोजी दादर चैत्यभूमी येथे दाखल झाली. मुंबई मध्ये मोठ्या प्रमाणात या अस्थींचे दर्शन घेवून भंते यांना अभिवादन करण्यात आले व धम्मदेसना होवून या पदायात्रा समारोप करण्यात आला.
या धम्मपद यात्रेच्या वाटेवर अनेक धार्मिक,सामाजिक, राजकीय, तसेच स्थानिक संघटनानी मोठया प्रमाणात सहभागी लोकांना पाणी, फळ, बिस्कीट व इतर अन्न पुरवले त्याच बरोबर वाटेवर फुलांचा वर्षाव करत अस्थीधातू कलश व भंते संघांचे भव्य स्वागत केले. या सर्वांचे तसेच सर्व स्वयंसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या वतीने या पदयात्रेचे मुख्य संयोजक सिद्धार्थ हत्तीअंभिरे व मुंबईचे मुख्य समन्वयक रमेश कांबळे यांनी जाहीर आभार मानले व या पुढेही आंबेडकरी समाज बांधवांनी सामाजिक व धार्मिक कार्यात अशीच आपली एकजूट दाखवावी असे आवाहन केले.