मुंबई: महापुरुषांचे कार्य जाती, धर्म, पंथ आणि प्रांत हे न बघता मानवाचे सकल मानवाचे कल्याण करणे हे कार्य असल्यामुळे ते कुठल्या एका जाती धर्माचे नसतात म्हणूनच त्यांना महापुरुष म्हणतात या महापुरुषांच्या विचारधारा आपण सर्वांनी स्वीकारून सामाजिक समतेचा व न्यायचा मार्ग स्वीकारावा असे आवाहन भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समितीचे अध्यक्ष व प्रसिद्ध स्तंभलेखक आणि राजकीय विश्लेषक दादाभाऊ अभंग यांनी कबीर मैत्री फाऊंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या महापुरुषांच्या जयंती महोत्सवा केले.
कबीर मैत्री फाऊंडेशन (रजि) खार (पश्चिम) यांच्यावतीने शनिवार दि.११ मे २०२४ रोजी सायंकाळी महाबोधी बुद्ध विहार येथे मोठ्या उत्साहात संयुक्त जयंती महोत्सव साजरा करण्यात आला यावेळी विविध स्पर्धेचे आयोजन केले होते सदर कार्यक्रमात सर्व स्पर्धकांनी खूप मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला स्थानिक नागरिकांनी कार्यक्रमाला खूप चांगला प्रतिसाद दिला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गट क्रमांक २० चे प्रतिनिधी आद.अरुण मोरे सर व बौद्ध स्मशानभूमी ट्रस्टचे कार्यकारणी आद.दामोदर जाधव यांनी उपस्थिती दर्शवली तसेच विशेष उपस्थिती म्हणून आद. दादाभाऊ अभंग हे उपस्थित होते तसेच कबीर मैत्री फाउंडेशनचा २०२४ पहिला समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, सदर कार्यक्रमासाठी विश्वरत्न को.ऑप.हौ. सोसा.व सत्यमेव जयते पॅनल यांची विशेष उपस्थिती लाभली आद.जितेंद्र जाधव यांनी अनुपस्थित असल्याकारणाने सहकाऱ्यांच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या, समाजसेवक रमेश भवार तसेच
ऑल वन क्यू फाऊंडेशन यांचे संस्थापक/अध्यक्ष आद.वैशाली रेड्डी व चिटणीस आद.कुणाल यादव यांनी विशेष उपस्तिथी दर्शविली, बौद्धजन ग्रामस्थ मंडळ सवणस मुंबई यांचे माजी कार्यकारणी तसेच सभासद आद. मनोज तांबे, आद.सिद्धार्थ तांबे व आद संजय जाधव यांनी उपस्थिती दर्शवली तसेच समाजसेवक चिंतामणी निवाटे (खारदांडा)यांची उपस्थिती लाभली. मैत्रेय सांस्कृतिक संघाची उपस्थिती लाभली, कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य आद.परेश मोरे, आद.अनिल जाधव, आद.अशोक मोरे, आद.सुधाकर तांबे यांनी केले कार्यक्रमाचे परीक्षक आद.निखिल विजय गमरे(सोनी मराठी व लॉर्ड बुद्धा फेम गायक) व आद.विशाल किसन जाधव (गायक कवी गीतकार संगीतकार) यांनी उत्तमरीत्या परीक्षण करून स्पर्धकांना गाण्यासंबंधी काही सूचना व मार्गदर्शन सुद्धा केले. कार्यक्रमाचे संपूर्ण छायाचित्रण आद.नंदकुमार घाटगे यांनी केले, बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक १४९, संघमित्रा महिला मंडळ, लुंबिनी सांस्कृतिक मंडळ, बौद्ध स्मशानभूमीचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांचे विशेष आभार तसेच जितेंद्र जाधव आणि सत्यमेव जयते पॅनेल यांचे ही विशेष आभार. कार्यक्रमाच्या शेवटी कबीर मैत्री फाउंडेशनचे संस्थापक व समाजसेवक प्रदिप अनंत तांबे यांनी सर्व उपस्थित पाहुण्यांचे स्पर्धकांचे उपस्थितांचे आभार मानले.
कराओके स्पर्धा
प्रथम क्रमांक
शामल सौंदरमल
द्वितीय क्रमांक
आनंद चंद्रमोरे
तृतीय क्रमांक
तुषार सोनवणे
उत्तेजनार्थ
सुनील शिंदे
नृत्य स्पर्धा
प्रथम क्रमांक
आराध्या कदम
द्वितीय क्रमांक
पूर्वी तांबे
तृतीय क्रमांक
निर्वाण नाट्य संघ
पूर्वा मोरे