मुंबई: कबीर मैत्री फाऊंडेशन यांच्या वतीने तथागत भगवान गौतम बुद्ध, प्रियदर्शी सम्राट राजा अशोक, छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा जोतीबा फुले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव शनिवार दि.११ मे २०२४ रोजी सायंकाळी ४.०० ते १०.०० या वेळेत महाबोधी बुध्द विहार (कार्टर रोड) येथे साजरा करण्यात येणार आहे. तसेच सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रम व स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमासाठी आयु.निखिल विजय गमरे (सोनी मराठी व लॉर्ड बुद्धा फेम गायक) व आयु.विशाल किसन जाधव (गीतकार/संगीतकार) परीक्षक म्हणून उपस्थित राहणार आहेत. विशेष उपस्थिती म्हणून भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समितीचे अध्यक्ष, प्रसिद्ध स्तंभलेखक व राजकीय विश्लेषक दादाभाऊ अभंग उपस्थित राहणार आहेत. तसेच गट क्र.१८ चे विभाग प्रतिनिधी सन्माननीय आयु.अशोक मोहिते साहेब व गट क्र.२० चे विभागप्रतिनिधी सन्माननीय आयु.अरुण मोरे सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य बौ.पं.स.शाखा क्र.१४९, संघमित्रा महिला मंडळ, लुंबिनी सांस्कृतिक मंडळ, सत्यमेव जयते पॅनल, जितेंद्र जाधव, संतोष तांबे, बौद्ध स्मशान भूमी ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात आले आहे व कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने धम्म बांधवांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन कबीर मैत्री फाऊंडेशनचे संस्थापक व समाजसेवक आयु.प्रदिप तांबे यांच्या वतीने करण्यात आले आहे.