कल्याण- डोंबिवली मधील गद्दारीला गाडून टाका…उद्धव बाळासाहेब ठाकरे, युवा नेते दीपेश पुंडलिक म्हात्रे यांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश….

Share

मुंबई : काही गद्दारांनी तुम्हाला खोटे विश्व दाखवले, तुमच्या डोळ्यावर झापडे होती. तुम्हालाही काही समजलं नाही पण तुम्हाला आता खरे समजले आहे. ज्यांनी आपलं सरकार पाडले त्या गद्दाराना मी कधी ही पक्षात घेणार नाही. पण जे नजरचुकीने गेले ज्यांना त्यांची चूक समजली अशा माझ्या शिवसैनिकांना मी पुन्हा पक्षात घेईल. दीपेश तू जर अगोदर आला असता तर लोकसभेत वेगळे चित्र दिसले असते. माझ्या साध्या शिवसैनिक कार्यकर्तीला पराभूत करण्यासाठी देशाच्या प्रधानमंत्री यांना बोलवावं लागले. सत्ता आणि पैसा असूनही माझ्या साध्या शिवसैनिक उमेदवाराने चार लाख मते घेतली. याचा मला अभिमान आहे. म्हणून दीपेश आता तुला शिवसेना हा पक्ष कल्याण डोंबिवली मध्ये वाढवायचा आहे हे मी तुला विनंती करणार नाही तर एक प्रकारे शिक्षा आहे आणि मला विश्वास आहे की तू कल्याण डोंबिवली मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हा पक्ष वाढवशील जोमात कामाला लागा आणि कल्याण डोंबिवली मध्ये विधानसभा निवडणुकीत आपला भगवा फडकवा असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी माजी नगरसेवक आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती दीपेश पुंडलिक म्हात्रे यांच्या पक्ष प्रवेशाचे वेळी मातोश्री येथे व्यक्त केले.
मागील काही दिवसापासून दीपेश पुंडलिक म्हात्रे हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षात प्रवेश करून डोंबिवली विधानसभा निवडणूक लढवणार अशी जोरदार चर्चा कल्याण डोंबिवली मध्ये सुरू होती परंतु ही चर्चाच राहते की काय असं वातावरण असतानाच आज दिनांक ६ ऑक्टोबर २०२४ रोजी शिवसेनेचे युवा नेते व कल्याण डोंबिवली मनपाचे माजी सभापती दीपेश म्हात्रे यांनी आपल्या हजारों समर्थक कार्यकर्त्यांसह १०० गाड्यांचा ताफा घेवून मातोश्री गाठली व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षात पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत. प्रवेश केला. दीपेश म्हात्रे यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना सांगितले की आमची ती चूक होती परंतु आम्ही ती चूक आता सुधारलेली आहे. यापुढे कल्याण डोंबिवली जिल्ह्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाची ताकद मोठ्या प्रमाणात आम्ही निर्माण करण्यासाठी दिवस रात्र मेहनत घेऊ. कल्याण डोंबिवली मधील अनेक माजी नगरसेवक, शिवसेनेचे पदाधिकारी हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षात प्रवेश करणार आहेत असे दीपेश पुंडलिक म्हात्रे यांनी सांगितले.आज दीपेश म्हात्रे यांच्यासह अनेक नगरसेवकांनी आज मातोश्री येथे पक्ष प्रवेश केला. आगामी काळात डोंबिवली विधानसभा मतदारसंघांमध्ये जर युवा नेते दीपेश पुंडलिक म्हात्रे यांना महाविकास आघाडीची उमेदवारी मिळाली तर डोंबिवली विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात काट्याची लढत बघायला मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *