पूर्वजांच्या शौर्याचे प्रतिक असलेला ऐतिहासिक जयस्तंभ वाचवणे ही आपली सामूहिक जबाबदारी..दादाभाऊ अभंग

Share

मुंबई : भीमा कोरेगाव येथील आपल्या पूर्वजांच्या शौर्याचं प्रतीक असलेला ऐतिहासीक जयस्तंभ ही आपली अस्मिता आहे सध्या जयस्तंभ अतिक्रमणाच्या विळख्यात आहे. जयस्तंभ अतिक्रमण मुक्त करणे व जयस्तंभ वाचवणं ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे असे आवाहन भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांनी रविवार दिनांक १० मार्च २९२४ रोजी सारनाथ बुद्ध विहार, खार मुंबई येथे आयोजित केलेल्या जनजागृती अभियान कार्यक्रमात केले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शिवशाही, शिवशाहीनंतर आलेली पेशवाई, आणि पेशवाईचा भीमा कोरेगाव मध्ये झालेला पराभव, या पराभवानंतर भीमा कोरेगाव येथे बांधण्यात आलेला जयस्तंभ व सध्या जयस्तंभ परिसरात झालेले अतिक्रमण व सध्याचा न्यायालयीन लढा याची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आयु. परेश मोरे होते. या कार्यक्रमात आयु. अशोक मोहिते, आयु. अरुण मोरे, महावीर कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त करून या लढ्यास पाठिंबा दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक भीमा कोरेगाव जयस्तंभ जनजागृती अभियान समितीचे समन्वयक आणि शाखेचे चिटणीस प्रदिप तांबे यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या खार येथील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सारनाथ बुद्ध विहार येथे त्रिशरण पंचशील घेऊन कार्यक्रमची सुरुवात करण्यात आली. भीमा कोरेगाव विजयस्तंभ वाचण्यासाठी व अतिक्रमण मुक्त करण्यासाठी बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक १४९, संघमित्रा महिला मंडळ तसेच लुंबिनी सांस्कृतिक मंडळ याच्या सर्व पुरुष महिला पदाधिकारी आणि सभासदांनी या लढ्यामध्ये आम्ही पूर्णपणे उतरणार आहोत आणि जयस्तंभ अतिक्रमण मुक्त करू अशा प्रकारचा निश्चय केला. महिलांचा प्रचंड असा प्रतिसाद हे या कार्यक्रमाचे वैशिष्ठे ठरले. कार्यक्रमासाठी संघमित्रा महिला मंडळाचे अध्यक्ष प्रियंका मोरे, उपाध्यक्ष प्रतीक्षा मोरे, चिटणीस विद्या गमरे, उपचिटणीस ज्योती गमरे, खजिनदार प्रगती जाधव, उप खजिनदार साक्षी कांबळे,हिशोब तपासणी शितल तांबे, सल्लागार करुणा गायकवाड, प्रमिला जाधव, उर्मिला पवार, संदेश वाहक नंदा तांबे, नलिनी तांबे व शाखा क्रमांक एकूण १४९ चे उपाध्यक्ष संतोष तांबे, खजिनदार अनिल जाधव, उपखजिनदार अशोक मोरे, सल्लागार संजय मोहिते, संदेश वाहक सुधाकर तांबे, लुंबीनी सांस्कृतीक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप पवार, उपाध्यक्ष संदीप नागे, चिटणीस सतीश धोत्रे, उपचिटणीस ऋषी तांबे, खजिनदार प्रसाद मोरे, तसेच मान्यवर दामोदर जाधव, अरविंद जाधव, एल. पी. महाडिक, पंकज यादव, रजनीताई अडसूळ, मंदाकिनी मोरे, राहुल जाधव, सुशांत तांबे, उमेश कांबळे, आनंद रुके, तसेच सारनाथ बुद्ध विहार संस्था सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी जनजागृती अभियानाचे समन्वयक तृषभ आव्हाड, जयेंद्र, गायकवाड, सुमेध गरुड, आकाश किरतकर, राज वाघमारे, भगवान कांबळे आधी उपस्थित होते. प्रदीप तांबे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बौद्धजन पंचायत समिती शाखा १४९, संघमित्रा महिला मंडळ व लुंबिनी सांस्कृतिक मंडळ यांनी प्रचंड मेहनत घेऊन हा ऐतिहासिक लढा वाचवण्यासाठी योगदान देण्याचे ठरवले. या न्यायालयीन लढ्यासाठी तन मन धन देऊन आणि हा लढा यशस्वी करू अशा प्रकारचे सांगून प्रत्यक्ष हा न्यायालय लढा लढण्यासाठी त्यांनी कृतीमधून आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली. या न्यायालयीन जनजागृती अभियानासाठी जो प्रतिसाद दिला व आपण या न्यायालय लढयामध्ये साथ देत आहात त्याबद्दल भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले. कार्यक्रमाची सरणती घेऊन समारोप करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *