बेडूक उड्या विरुद्ध एकनिष्ठेची लढाई… खासदार डॉ.अमोल कोल्हे

Share

मुंबई : माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार यांच्या गटामध्ये प्रवेश करणार असून त्यांच्या या चौथ्या पक्षप्रवेशाला खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी शुभेच्छा दिल्या असून शिरूरची लढाई ही बेडूकउड्या विरुद्ध एकनेष्ठीची लढाई असेल असे विधान शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षप्रवेशाच्या संदर्भात केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या पक्षातर्फे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांची उमेदवारी नक्की मानल जात असली तरी त्यांच्या समोर विरोधी पक्षाचा उमेदवार कोण असेल यावर उलट सुलट चर्चा चालू होती. शेवटी अजित पवारांना उमेदवार आयात करावा लागला. शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उमेदवारीविषयी खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी सांगितलं होतं की मी घरी बसेल परंतु शिवाजीराव आढळराव पाटील यांचा प्रचार करणार नाही परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलीप मोहिते पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्यानंतर आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यापुढे लोटांगण घातले आहे. मागील वीस वर्ष शिवाजीराव आढळराव पाटील व खेड आळंदीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यामध्ये राजकीय संघर्ष होता. यामध्ये अनेक कार्यकर्त्यांचे नुकसान झाले परंतु स्वतःच्या राजकीय भवितव्यासाठी दिलीप मोहिते पाटील यांनी आढळराव पाटील यांच्याशी जमवून घेतले आहे. मोहिते पाटील यांनी पक्षाचा आपण प्रचार करणार आहोत अशा प्रकारचे सांगितले आहे. शिवाजीराव आढळराव पाटील यांचा राजकीय प्रवास हा प प्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नंतर शिवसेना नंतर शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट असा झालेला आहे. खासदार अमोल कोल्हे यांची संसदेतील भाषण शेती, शेतकरी, कामगार व मजुरांसाठी अशी झाली आहे. त्यांची संसदेतील भाषण मतदारसंघातील अनेक प्रश्नांच्या संदर्भात झाल्याने त्याच जोरावर त्यांना संसद रत्न पुरस्कार मिळालेला आहे. अमोल कोल्हे हे मतदारसंघात फिरकत नाही असे अनेक लोक बोलतात परंतु पंचायत राज प्रमाणे सत्तेचे विकेंद्रीकरण झाल्याने खासदाराचे काम काय, आमदारांचं काम काय, जिल्हा परिषदचे काम काय पंचायत समितीचे काम काय आणि ग्रामपंचायत चे काम काय हे सर्व सत्तेचे वाटप झाल्याने प्रत्येकाने आपल्या अखत्यारीत कामे केली जातात. कुणी कुणाच्या कामात लुडबुड करायची नसते.सत्तेचे विकेंद्रीकरण झालेलं आहे आणि त्या त्या पदांची काम त्या त्या ठिकाणी केले जातात. खासदार अमोल कोल्हे यांनी संसदेत मतदार संघाच्या प्रश्नांचा पाठपुरावा करून अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावलेले आहेत. खासदार अमोल कोल्हे यांची संसदेतील भाषणे यावर न बोलता अमोल कोल्हे हे मतदार संघात फिरकले नाही अशा प्रकारचे सांगून विरोधक लोकांच्या नजरेत धुळफेक करीत आहे. अमोल कोल्हे यांनी संसदेत अनेक प्रश्न मांडलेले आहेत आणि म्हणून अमोल कोल्हे म्हणाले की दिल्लीच्या पुढे गुबू गुबू वाजवल्यावर मान हलवणारे नंदीबैल पाहिजे की संसदेमध्ये डरकाळी फोडणारा वाघ पाहिजे हे मतदारांनी ठरवावे. शिरूर लोकसभेची निवडणूक ही जरी अटीतटीची वाटत असली तरी सत्तेच्या पदासाठी शिवाजी आढळराव पाटील यांचे चार वेळा पक्षांतर अर्थात बेडूक उड्या आणि डॉ. अमोल कोल्हे यांची जनतेशी आणि पक्षाशी एकनिष्ठा याच्यावर मतदार राजा काय निर्णय घेतो ते आगामी काळात कळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *