वाडा : शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संसदरत्न डॉ. अमोल कोल्हे यांच्या निवडणूक प्रचारासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचे खेड तालुक्याचे नेते अतुलभाऊ देशमुख यांच्या नेतृत्वाखाली वाडा या गावी भव्य अशी रॅली काढण्यात आली होती या रॅलीमध्ये असंख्य कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तसेच महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्षातील नेते पदाधिकारी यांनी या रॅलीत सहभाग घेतला. या रॅलीत वाडा गाव व परिसरातील असंख्य मतदारांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. यादरम्यान अतुलभाऊ देशमुख यांनी मतदार छोट्या छोट्या चौक सभा घेऊन तसेच मतदारांशी संवाद साधून मतदारांना विचारले की आपल्याला संसदेमध्ये मौनी बाबा खासदार पाहिजे की संसदेमध्ये आपले प्रश्न मांडणारा व संसदेत बोलणारा खासदार पाहिजे? डॉक्टर अमोल कोल्हे यांनी मागील पाच वर्षांमध्ये संसदेमध्ये अनेक प्रश्न मांडलेले आहेत. महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, दुधाचे भाव, कांदा निर्यातबंदी तसेच नवीन नवीन प्रकल्प यासाठी संसदेत आवाज उठवला असून अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. बैलगाडा शर्यती बंदी संदर्भात संसदेत सतत पाठपुरावा करून बैल गाडा शर्यती वरील बंदी खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी उठवली आहे. त्यांनी संसदेत अनेक प्रश्न मांडून ते मार्गी लावलेले आहेत. संसदेतील त्यांची उपस्थिती आणि संसदेतील त्यांचा बुलंद आवाज यामुळेच त्यांना संसद रत्न हा पुरस्कार मिळाला आहे. संसदेमध्ये आपले प्रश्न मांडणारा बुलंद आवाज डॉक्टर अमोल कोल्हे असून अमोल कोल्हे यांना आपल्या मतदारसंघातील प्रश्न मांडण्यासाठी व त्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी डॉक्टर अमोल कोल्हे यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन वाडा गावातील मतदारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे खेड तालुक्याचे नेते अतुलभाऊ देशमुख यांनी मतदारांना केले.
शनिवार दिनांक ४/५/२०२४ रोजी खेड तालुक्यातील वाडा या गावी अतुलभाऊ देशमुख यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीची भव्य रॅली काढण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस व महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षातील नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया प्रमाणात सहभागी झाले होते. महाविकास आघाडीतील सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संपूर्ण खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात डॉ.अमोल कोल्हे यांचा प्रचार मोठ्या प्रमाणात सुरू असून त्याला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. संपूर्ण देशात भाजप आणि त्यांच्या सोबत असलेल्या पक्षांच्या विरोधात मतदारांमध्ये मोठी लाट असून खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात ही प्रचंड विरोधी लाट असल्याने या मतदारसंघातून जास्त जास्त मताधिक्य डॉ. अमोल कोल्हे यांना मिळावं यासाठी महाविकास आघाडीचे सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते दिवस रात्र मेहनत घेत आहे. डॉ. अमोल कोल्हे यांचे पाच वर्षात संसदेत तसेच शिरूर लोकसभा मतदारसंघांत केलेलं काम जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे तुतारी वाजवणारा माणूस हे निवडणूक चिन्ह घराघरांमध्ये पोचवण्याचं काम महाविकास आघाडीचे सगळे पदाधिकारी, कार्यकर्ते, नेते करीत आहेत. डॉक्टर अमोल कोल्हे यांना २०१९ पेक्षा २०२४ मध्ये अधिकाधिक मताधिक्य मिळवून देण्याचा चंग महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी बांधलेला आहे. महाविकास आघाडी ही एक संघ असून सर्वजण हातात हात घेऊन डॉ.अमोल कोल्हे यांचा प्रचार करीत असून डॉक्टर अमोल कोल्हे यांना प्रचंड मतांनी निवडून द्या असे आवाहन वाडा या गावांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचे खेड तालुक्याचे नेते व राजगुरुनगर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य अतुलभाऊ देशमुख यांनी केले आहे.