अमोल कोल्हे यांना पराभूत करण्यासाठी रडीचा डाव खेळणाऱ्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि त्यांच्या मित्रमंडळीचा रडीचा डाव उधळून लावला …आमदार रोहित पवार

Share

पुणे : डॉ.अमोल कोल्हे यांना पराभूत करण्याची ‘राष्ट्रीय अध्यक्षां’नी केलेली प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी लोकशाही मार्गाने प्रयत्न होईल, असं वाटलं होतं. पण त्याऐवजी डॉ. अमोल कोल्हे या निष्ठावान आणि स्वाभिमानी मावळ्यासोबत मैदानात लढण्याऐवजी त्यांच्या अर्जावर फालतू आक्षेप घेऊन त्यांना निवडणुकीच्या मैदानातूनच बाहेर ढकलण्याचा ‘राष्ट्रीय अध्यक्षां’च्या गटाने प्रयत्न केला. हा प्रयत्न म्हणजे पडण्याच्या खात्रीने खेळलेला रडीचा डाव होता. मात्र हा डाव हाणून पाडल्याबद्दल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे आभार पण अर्ज बाद झाल्याचं समजून फटाक्यांचा जल्लोष करणाऱ्या विरोधकांचा आनंद लगेच मावळला. त्यांना या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो, ही प्रार्थना! आता… फैसला जनता करेगी!
अब लडेंगे और जितेंगे असे मत आमदार रोहित पवार यांनी अमोल कोल्हे यांचा अर्ज वैध झाल्यानंतर सोशल मीडियावर व्यक्त केले.

डॉ. अमोल कोल्हे यांना पराभूत करण्यासाठी अजित पवार यांनी विडा उचललेला आहे परंतु तो विडा यशस्वी करण्यासाठी अजित पवार आणि त्यांची मित्रमंडळी चुकीचं आणि रडीचा डाव खेळत असून अमोल कोल्हे यांचा अर्ज बाद करण्यासाठी जो प्रयत्न केला त्याबद्दल शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये अजित पवार आणि त्यांच्या मित्र मंडळी विषयी मोठा रोष निर्माण झाला आहे. डॉ.अमोल कोल्हे यांच्या अर्जावर जे आक्षेप घेतले होते ते निवडणूक आयोगाने सर्व तपासल्यानंतर सर्व आक्षेप फेटाळून लावले व डॉ. अमोल कोल्हे यांचा अर्ज वैध ठरवला. डॉ. अमोल कोल्हे यांचा अर्ज अवैध होतोय म्हणून अजित पवार मित्र मंडळी यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये सगळीकडे फटाकड्या फोडल्या परंतु त्यांचा हा आनंद क्षणिक मावळला. महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या पद्धतीने अजित पवार फडणवीसच्या माध्यमातून घाणेरडे राजकारण करत आहेत याबद्दल अनेक मतदारांनी संताप व्यक्त केला. निवडणुकीमध्ये भाजप आणि अजित पवार यांचा डाव जनता उधळून लावीन अशा प्रकारचे भावना संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये आहे. भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या विरुद्ध भूमिका, महागाई, बेरोजगारी, पक्ष फोडणे, एकमेकांच्या विरोधात भांडण लावणे, भ्रष्टाचाराचे आरोप करणे आणि आपल्या पक्षांमध्ये घेऊन मशीन मध्ये पावडर टाकून त्यांना क्लीन करणे. ७० हजार कोटींचा भ्रष्टाचार असा आरोप करणे आणि चार दिवसात लगेच आपल्या आघाडीत घेऊन त्यांना उपमुख्यमंत्रीपद देणे हे आता ग्रामीण भागामध्ये सर्व टीव्ही मोबाईल बघून सोशल मीडियाच्या माध्यमातून गावागावांमध्ये खेड्या पाड्यातील पारावर, चावडीवर मोठ्या प्रमाणात लोक लोक चर्चा करीत आहेत. भाजप सरकार हे या राज्यातून आणि देशातून उखडून टाकायचा विडा जनतेने उचलला आहे. भारताचे संविधान आणि संसदीय लोकशाही उद्ध्वस्त करू पाहणाऱ्या भाजपला आणि त्यांच्या सोबत असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जनता धडा शिकवणार आहेत असे अनेक मतदारांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *