हिंदू खाटीक समाजाच्या मागण्या सरकारने तात्काळ मंजूर करून सामाजिक न्याय देण्यात यावा…दादाभाऊ अभंग

Share

मुंबई: पिढ्यान पिढ्या सर्व जाती-धर्माची सेवा करणारा शांतता प्रिय हिंदू खाटीक समाज यांनी आतापर्यंत कुठलीही मागणी केली नाही. मागील अनेक वर्ष हा समाज दुर्लक्षित राहिला त्यामुळे त्यांची उन्नती व प्रगती होऊ झाली नाही. अनेक वर्षांच्या त्यांच्या मागण्या या प्रलंबित असून या मागण्या सरकारच्या दृष्टीने अत्यंत सोप्या आहेत. हिंदू खाटीक समाज हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर विश्वास ठेवणारा समाज असून संविधानाच्या माध्यमातून आंदोलन करीत असून हिंदू खाटीक समाजाला सरकारने तात्काळ न्याय देण्यात यावा व त्यांच्या सर्व मागण्या मंजूर करून त्यांची तात्काळ अंमलबजावणी करावी असे ज्येष्ठ पत्रकार दादाभाऊ अभंग यांनी सरकारला आवाहन केले.मुंबईतील आजाद मैदान येथे उपोषण करणाऱ्या सर्व हिंदू खाटीक समाजाच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली त्यावेळी अखिल भारतीय हिंदू संतूजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष ॲड. प्रदीपसिंह गंगणे, हिंदू खाटीक समाजाचे नेते रमेश जाधव उपस्थित होते.
दि.९ऑगस्ट २०२४ रोजी अखिल भारतीय संतुजी ब्रिगेड संस्थापक अध्यक्ष अँड. प्रदिपसिंह.तु.गंगणे यांच्या नेतृत्वाखाली हुतात्मा स्मारकास अभिवादन करून महाराष्ट्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
मागण्या १) हिंदूखाटीक समाजभूषण,महामानव,सत्यशोधक समाजाचे अग्रदुत डॉ.संतुजी रामजी लाड यांची ४ मार्च जयंती तर ८ ऑक्टोबर पुण्यतिथी शासन स्तरावर साजरी करण्यात यावी व तसेच डॉ संतुजी रामजी लाड यांचे नावे “आर्थिक विकास महामंडळ” स्थापन करण्यात यावे.
२) महाराष्ट्रातील हिंदु खाटीक समाजाला विविध भागात विविध नावाने उदा. मराठा खाटीक,क्षत्रिय खाटीक,धनगर खाटीक, कलाल,खाटीक कलाल, बक्कर कसाब, लाड खाटीक, बक्कर खाटीक या नावाने ओळखले जाते. जे सर्व पिढ्यान पिढ्या लहान प्राण्यांचे मांस विक्रीवर उपजीविका भागविनारे एकमेकांचे रक्त-नातेवाईक खाटीक जातीचे असल्याची वस्तू स्थिती शासनाने स्वीकारावी.
३) डॉ.संतुजी रामजी लाड यांचे नावे समाज मंदिर, सांस्कृतिक सभागृह, समाज भवनसाठी जागा व निधी उपलब्ध करून देण्यात यावा.
४) डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था (बार्टी )पुणे व मिटकॉन लि.मार्फत मटन व्यवसायिकांना चिकन,मटन,मासे फूड प्रोसेसिंग च्या माध्यमातून जोडधंदा उभारण्यासाठी प्रशिक्षण देण्यात यावे,तसेच दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना विविध व्यवसाय निशुल्क क्षमता बुद्धी प्रशिक्षण कार्यक्रमात प्रशिक्षण देणे.
५) शिवचित्रकार कलायोगी गोपाळराव बळवंतराव कांबळे कोल्हापूर यांना मरनोपरांत महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात यावें.
६)संत उपासराव महाराज नागपूर संत गंगानाथ महाराज मठ, पुणे यांच्या विकासासाठी आर्थिक भरीव निधीची तरतूद करण्यात यावी.
७) हिंदु खाटीक समाजाच्या उन्नतीसाठी कलस्टर हाऊसची निर्मिती करावी तसेच डॉ संतुजी रामजी लाड यांच्या नावे शैक्षणिक संकुल ,निवासी विद्यालय निर्माण करण्यात यावे.
८) महाड चवदार तळे क्रांतिकार लढयातील डॉ. बाबासाहेब आंबेडकराचे सहकारी रामचंद्र खडूजी कांबळे उर्फ चंदू मामा खाटीक, स्वातंत्र्यसैनिक उद्धवराव इंगोले, व स्वातंत्र्यसैनिक रघुनाथनाना जाधव, अशोक पेंढारी यांच्या नावे सामाजिक न्याय विभागातर्गत पुरस्कार देण्यात यावा.
९) डॉ.संतुजी रामजी लाड यांचा जन्म, कार्य ठाणे जिल्ह्यामध्ये होते तसेच ते ठाणे तत्कालीन नगर पालिकेचे सदस्य म्हणून ही कार्यरत होते त्यामुळे त्यांचे ठाणे शहरात स्मरण व्हावे यासाठी ठाणे,लातूर या ठिकाणी ऐतिहासिक स्थळांच्या विकासांतर्गत स्मारक, अभ्यासिका, ग्रंथालय उभारण्यात यावे.
१०) महाराष्ट्र राज्यात मा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार एस सी प्रवर्गाचे अ ब क ड वर्गीकरण करणार असाल तर हिंदू खाटीक जातीसाठी स्वतंत्र ५% टक्के आरक्षण आरक्षित ठेवण्यात यावे. आदी मागण्यासाठी अँड अमितकुमार कोथमिरे सोलापूर, श्री सुनिलकुमार कांबळे छत्रपती संभाजी नगर, श्री संजयकुमार साबणे नांदेड, श्री बालाजी बिनवडकर, डॉ रावसाहेब खिरडकर जातेगाव नाशिक, पत्रकार साईनाथ घोणे,श्री दिगंबर कांबळे लातूर,अमोल फिसके देवणार मुंबई, श्री योगेश डोंगरे, श्री महेश विजापूरे, श्री इंद्रजित गंगणे, श्री चंद्रकांत आबा थोरात, श्री सुरेश थोरात पुणे, श्री सूरज कांबळे आदींनी सहभाग नोंदविला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *