डोंबिवली: कल्याण -डोंबिवली महानगरपालिकेच्या ई प्रभाग क्षेत्रामध्ये अनाधिकृत बांधकामे, अतिक्रमणे तसेच विनापरवाना खाद्यपदार्थाच्या गाड्या आणि स्टॉल याविषयी माननीय आयुक्त यांच्याकडे वारंवार तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेऊन आयुक्तांनी उपायुक्त (अंबानि) यांच्याकडे पत्र पाठवून संबंधित पत्रावर कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले होते. श्री. बोरकर, उपायुक्त (अंबानि) यांनी पत्र क्रमांक संदर्भ: अबांनि ७०/१०/१०/२०२३ तसेच श्री.अवधूत तावडे, उपायुक्त (अबांनि) संदर्भ पत्र क्रमांक उपायुक्त(अबांनि)/मुका/१४४/९/५/२०२४ या दोन्ही उपायुक्तांनी ई प्रभागांमध्ये पत्र पाठवून संबंधित विषयानुरूप कारवाई करावी अशा प्रकारचे आदेश ई प्रभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले होते परंतु इ प्रभागाचे संबंधित अधिकाऱ्यांनी सदर पत्राची कुठलीही दखल घेतलेली नाही. अधीक्षक यांना विचारल्यानंतर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन बेजबाबदार उत्तर दिले. तसेच ई प्रभागाचे अधीक्षक हे स्वतः जन माहिती अधिकारी असून त्यांच्याकडे माहिती मागितल्यावर माहिती देत तर नाही पण दिली तर खोटी माहिती देऊन दिशाभूल करणारी चुकीची माहिती देऊन माहितीचां अर्ज केराच्या टोपलीत टाकून देतात. ई प्रभागात अनेक अनाधिकृत बांधकामे,अतिक्रमणे व विना परवाना खाद्यपदार्थाचे स्टॉल आणि हातगाड्या चालू असून याला संरक्षण देण्याचे काम ई प्रभागाचे संबंधित अधिकारी करीत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पत्राला केराची टोपली दाखवणारे व पत्रांची दखल न घेणाऱ्या ई प्रभागाचे संबंधित अधिकारी यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशा प्रकारची तक्रार आयुक्त यांना केली आहे. आयुक्तांनी संबंधित पत्रांची दखल न घेतल्यास उपोषणाचा इशारा पत्रात देण्यात आला आहे.