डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले भारतीय संविधान कुणीही बदलू शकत नाही..नितीनभाऊ मोरे

Share

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानात अशी मेख मारून ठेवली आहे की कुठलेही सरकार आले तरी भारतीय संविधान बदलू शकत नाही. संविधान बदलणार असे सांगून काही पक्षांनी मते घेतली घेतली असतील पण आम्ही संविधानाचा जागर मागील तीन महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात करीत आहोत व त्या सर्व संविधान जागर यात्रेचा समारोप व या यात्रेत सामील झालेल्या कार्यकर्त्यांचा सत्कार मुंबईतील शिवाजी नाट्यमंदिर मध्ये होणार आहे तरी सर्वांनी या कार्यक्रमात सामील व्हावे असे आवाहन संविधान जागर समितीचे संयोजक नितीनभाऊ मोरे यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत केले.
मुंबईत संविधान जागर समिती महाराष्ट्र आयोजित संविधान जागर यात्रा ९ ऑगस्ट २०२४ रोजी सत्याग्रह भूमी चवदार तळे महाड येथे भारतरत्न संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना तसेच रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून क्रांती दिनाच्या दिवशी सुरुवात करण्यात आली. संविधान जागर यात्रा आजपर्यंत महाड, रायगड, खेड. रत्नागिरी, पतीत पावन मंदिर, सिंधुदुर्ग, कणकवली, कोल्हापूर शाहू समाधी दर्शन, हातकणंगले, सांगली पेठ नाका. सातारा, पिंपरी चिंचवड, पुणे कॅन्टोन्मेंट, महात्मा फुले वाडा, वस्ताद लहुजी साळवे समाधी, अहमदनगर, माळशिरस, सोलापूर, तुळजापूर, उमरगा, लातूर, उदगीर, देगलूर, नांदेड, हिंगोली, परभणी, केज, बीड, संभाजीनगर, बदनापूर, जालना, चिखली, मेहकर, वाशिम, उमरखेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, अर्जुनी मोरगाव, गोंदिया, भंडारा, उमरेड, दीक्षाभूमी, नागपूर, वर्धा, अमरावती, दर्यापूर, मुर्तीजापुर, अकोला, जळगाव वरून धुळे नाशिक कल्याण अंबरनाथ उल्हासनगर ठाणे करत संविधान जागर यात्रा ६ सप्टेंबर रोजी मुंबईत दाखल होणार आहे.
मुंबईच्या दिशेने येत असताना अनेक ठिकाणी अनेक जिल्ह्यांमध्ये संविधान यात्रेचे जल्लोषपूर्वक रित्या स्वागत करण्यात आले. अनेक संघटनांच्या वतीने महाराष्ट्रभर संविधान जागर यात्रेचे उत्साहाने स्वागत होत असताना, संविधानाबद्दल निर्माण झालेला गैरसमज दूर करण्याच्या दृष्टिकोनातून यात्रा जवळ पास यशस्वी झाली. आहे.
तसेच भारतीय संविधान अमृत महोत्सव वर्ष असल्यामुळे एक वेगळा जोश एक वेगळे वातावरण आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत कष्टाने आपल्या सर्वांना अर्पण केलेलं भारतीय संविधान याची ताकद, महती भारतीय संविधान देशाच्या प्रगतीमध्ये नव भारतच्या दिशेने विश्वामध्ये या देशाला एक उच्च स्थान देण्यासाठी फार महत्त्वाची भूमिका संविधानाने निभावली. तळागाळातील खेड्‌यापाड्‌यात राह‌णाऱ्या सर्व मंडळींना ही भावना हा संदेश पोहचवण्याचे कार्य संविधान जागर यात्रेच्या माध्यमातून सर्व संयोजक पार पाडत आहेत.
६ सप्टेंबर २०२४ रोजी संविधान रथाचे मुंबईत आगमन होताच अनेक ठिकाणी त्याचे स्वागत होणार असून सायंकाळी ४ वाजता वंदनीय बौद्ध भिक्षु संघ व भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा. डॉ.भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये चैत्यभूमी दादर या ठिकाणी स्वागत करण्यात येईल. त्या ठिकाणी परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून रॅलीच्या स्वरूपामध्ये संविधान जागर यात्रा छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर दादर येथे पोहोचल्यानंतर सभागृह मध्ये संविधान सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
संविधान जागर यात्रा समारोप सभेमध्ये केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू व केंद्रीय मंत्री भूपेन्द्र यादव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर या कार्यक्रमांमध्ये इतर अनेक मान्यवर मंडळी खासदार, आमदार उपस्थित राहणार असून या संविधान सभेला मुंबई शहरातील तमाम आंबेडकरवादी संघटना मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहणार आहेत.
संविधान सभेला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या सर्व बहुजन समाजातील मंडळीच्या उपस्थितीमध्ये सदर कार्यक्रम पार पडणार आहे. आपले घरदार सोडून तब्बल ३० दिवस ६००० किलोमीटर प्रवास करून खेड्यापाड्यांमध्ये संविधान समजावून सांगण्याचं काम ज्या संयोजन मंडळींनी केले त्या सर्वांचा सत्कार उपस्थित महाराष्ट्र राज्यातील विविध सामाजिक संघटनेच्या प्रमुखांच्या हस्ते होणार आहे असे नितिनभाऊ मोरे (संयोजक, संविधान जागर समिती महाराष्ट्र) संविधान जागर यात्रा २०२४ यांनी सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *