भीमा कोरेगाव अतिक्रमण न्यायलय लढाईत दादाभाऊ अभंग यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार…मिलिंद अवसरमोल (अमेरिका)

Share

मुंबई: भीमा कोरेगाव जयस्तंभ परिसरात माळवदकर कुटुंबाने अतिक्रमण केले आहे त्या विरोधात भिमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण आणि संवर्धन समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग हे समितीच्या वतीने न्यायालयीन लढाई लढत असून मागील सर्व निकाल हे समितीच्या बाजूने लागल्याने सध्या ही न्यायालयीन लढाई मुंबई उच्च न्यायालयात सुरू असून मी व माझ्यासारखे असंख्य सहकारी दादाभाऊ अभंग यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असून सर्व आंबेडकरी समाज बांधवांनी या लढ्यात प्रत्यक्ष सामील व्हावे असे आवाहन आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक, Ambedkar International Mission चे Director मिलिंद अवसरमोल यांनी केले. मिलिंद अवसरमोल अमेरिकेत असून ते आंबेडकरी चळवळीचे विचारवंत आणि अभ्यासक आहेत. अमेरिकेत आंबेडकरी चळवळीचा प्रचार आणि प्रसार करतात. ते चांगले व्याख्याते आहेत. त्यांच्या मातोश्री शांताबाई एकनाथ अवसरमोल यांचे नुकतेच दुःखद निधन झाल्याने ते भारतात आलेले आहेत. त्यांना समजले की भीमा कोरेगाव अतिक्रमण आज दिनांक १६/२/२३ रोजी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी आहे ते त्यांच्या पूर्णिमा बहिणी सोबत मुंबई उच्च न्यायालयात आले. सुनावणीला हजर राहिले. त्यांनी संपूर्ण न्यायलय कामकाजाची माहिती घेतली व आपण ही न्यायलय लढाई नक्की जिंकू असा विश्वास समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांना दिला. मिलिंद अवसरमोल हे सुरुवातीपासूनच भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समितीच्या न्यायालय लढाईत पाठीशी असून ते समितीचे मार्गदर्शक आहेत. वेळोवेळी न्यायलायिन कामकाजाची माहिती घेतात. समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांनी अतिक्रमण व न्यायलय कामकाज असलेले माहिती पत्रक देऊन त्यांचे आभार मानले.

3 thoughts on “भीमा कोरेगाव अतिक्रमण न्यायलय लढाईत दादाभाऊ अभंग यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार…मिलिंद अवसरमोल (अमेरिका)

  1. खुप खुप अभार साहेब तुमच्या कार्याला सलाम तुमच्या पाठी आम्हीं मनापसून आहोत राहणार 🙏🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *