आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते चंद्रकांत लक्ष्मण अभंग यांचे दुःखद निधन…पुण्यानुमोदन कार्यक्रम रविवारी मुंबई येथे

Share

मुंबई: धम्मक्रांती मित्र मंडळ कळमोडी या संस्थेचे सल्लागार आणि आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रकांत लक्ष्मण अभंग (मु.कळमोडी, ता. खेड जि. पुणे व हल्लीचा पत्ता डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, कफरेड, कुलाबा मुंबई) यांचे गुरुवार दि.२८ मार्च २०२४ रोजी सकाळी १०.०० वा. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या मुंबईतील निवासस्थानातून सायंकाळी ५.०० वाजता काढली व ५.३० वा. चंदनवाडी स्मशानभूमी येथे आल्यानंतर त्यांच्यावर सायंकाळी ६.०० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी निर्णायक एल्गार चे संपादक दादाभाऊ अभंग यांनी चंद्रकांत अभंग यांना श्रद्धांजली वाहिली. चंद्रकांत अभंग यांच्या सामाजिक आणि कौटुंबिक कार्याला उजाळा दिला. चंद्रकांत अभंग हे अत्यंत मृदू, शांत, मितभाषी, कुणाशी ही न भांडणारे असे अजातशत्रू होते. आंबेडकरी चळवळीत तसेच कळमोडी गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवात प्रत्येक वर्षी ते हिरारीने भाग घेत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर कुलाबा येथे आंबेडकरी चळवळीत ते नेहमी अग्रेसर राहत असे. चंद्रकांत अभंग यांच्या निधनाने अभंग परिवाराची तसेच आंबेडकरी चळवळीची मोठी हानी झाली आहे. यावेळी सामाजिक व धार्मिक चळवळीतील अनेक मान्यवर, अभंग परिवारातील आप्तेष्ट आणि मित्र परिवार यांनी सामुदायिक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
चंद्रकांत अभंग यांचा मोठा परिवार असून त्यात पत्नी संगीता चंद्रकांत अभंग, मुलगा दीक्षांत चंद्रकांत अभंग, मुलगी रिया चंद्रकांत अभंग, भाऊ नारायण लक्ष्मण अभंग, बहीण शांता पोपटराव वंजारी, पुतणे विकास आनंद अभंग तसेच भाऊ, भावजय, पुतणे, बहिणी व मित्र परिवार मोठा आहे.

चंद्रकांत अभंग यांचा पुण्यानुमोदन कार्यक्रम रविवार दिनांक ३१ मार्च २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, साधू टी. एल. वासवानी मार्ग, कफरेड, कुलाबा, मुंबई ५ येथे आयोजित केला असून या पुण्यानुमोदन कार्यक्रमास आपण सर्वांनी उपस्थित राहावे असे अभंग, गायकवाड परिवार तसेच ग्रामस्थ मंडळी कळमोडी आणि धम्मक्रांती मित्र मंडळ कळमोडी यांनी विनंती केली आहे.
संपर्कासाठी:
१) नारायण लक्ष्मण अभंग
मो. 8468846723
२) विकास आनंद अभंग
मो.9930357625

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *