पुणे जिल्ह्यात भाजपला धक्का…अतुल देशमुख यांचा राजीनामा

Share


खेड : पुणे जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे खेड तालुका माजी अध्यक्ष व खेड तालुका निवडणूक प्रमुख अतुल देशमुख यांनी भारतीय जनता पार्टीचा प्राथमिक सदस्य तसेच इतर सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. या राजीनामा पत्रात त्यांनी भाजपकडून ज्या पद्धतीने वागणूक दिलेली आहे त्याचा स्पष्ट उल्लेख केला असून त्यात खेड आळंदी विधानसभा मतदारसंघांमध्ये इतर पक्षातील लोकांना निधी मिळाला परंतु माझ्या वाशेरे नायफड गटाला जो निधी मिळाला पाहिजे तो मिळाला नाही अशी नाराजी व्यक्त केली आहे. अतुल देशमुख यांनी भारतीय जनता पार्टी वाढवण्यासाठी सतत प्रयत्न केला परंतु त्यांच्याकडे नेहमीच दुर्लक्ष केलं अशी भावना अतुल देशमुख यांनी व्यक्त केली आहे. आपली शिवाजीराव आढळराव पाटील यांना उमेदवारी दिली म्हणून कुठलीही नाराजी नाही तर खेड आळंदी चे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या राजकीय भूमिकेचा मी विरोधक असल्याकारणामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली मी निवडणुकीत काम करू शकत नाही. तसेच उद्या शिवाजीराव आढळराव पाटील यांना खेड आळंदी विधानसभा मतदार संघातून चांगली मते मिळाली तर दिलीप मोहिते पाटील सांगतील हे सर्व माझ्यामुळे झालं आणि कमी मते मिळाली तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर खापर फोडतील त्यामुळे आपण अशा यश अपयशामध्ये न थांबता माझे सर्व सहकारी, मतदार यांच्याशी चर्चा करून आपण भारतीय जनता पार्टीचा प्राथमिक सदस्य तसेच सर्व पदाचा राजीनामा दिला आहे.
अतुल देशमुख हे खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील युवकांचे आणि सामान्य माणसाचं प्रश्न व समस्या सोडवण्यामध्ये ते परिचीत असून तळागाळातील कार्यकर्त्यांशी व जनतेशी त्यांची नाळ जोडलेली आहे. त्यांच्याकडे कोणीही गेला तर त्यांच्या समस्यांचे निराकरण करून त्यांना न्याय देण्याचे काम अतुल देशमुख हे करीत असतात. आपला माणूस, आपला भाऊ अशा प्रकारची अतुल देशमुख यांची खेड आळंदी विधानसभा मतदारसंघांमध्ये ओळख आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष लढून सुद्धा प्रस्थापित शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधामध्ये पन्नास हजार पेक्षा अधिक मते घेऊन अतुल देशमुख यांनी आपली ताकद दाखवून दिली आहे. स्वाभिमानी कुणालाही न झुकणारा अत्यंत कट्टर आणि आपल्या खेड तालुक्यातील जनतेवर तसेच कार्यकर्त्यांवर प्रेम करणारा आणि कार्यकर्ते सांगेल अशा प्रकारचं वागणारा म्हणून अतुल देशमुख यांची ख्याती आहे.
मी घरी बसेल परंतु शिवाजीराव आढळराव पाटील यांचा प्रचार करणार नाही अशी घोषणा काही पलटूराम यांनी केली होती पण काही दिवसांतच याच पलटूराम यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यापुढे लोटांगण घातले. बोलायचे एक आणि करायचे एक असे पलटूराम यांची मोठी संख्या सध्या पुणे जिल्ह्यात वाढली आहे.
अतुल देशमुख यांची एक वेगळी ओळख आहे. आता अतुल देशमुख कुठली राजकीय भूमिका घेतात हे त्यांच्या सहकाऱ्यांच्या व मित्र मंडळाच्या बैठकीत ठरेल. पण अतुल देशमुख जो निर्णय घेतील तिथे त्या आघाडीचे त्या पक्षाचे पारडे जड होईल एवढं मात्र निश्चित.
अतुल देशमुख यांनी स्वाभिमान जपला असून आपल्या स्वाभिमानला कुठे धक्का लागतो हे बघितल्यानंतर सत्ता अथवा पक्षाची पदे फेकून दिली आहेत. आणि म्हणूनच खेड आळंदी विधानसभा मतदारसंघांमध्ये त्यांची युवकांमध्ये मोठी क्रेझ आहे. अतुल देशमुख पुढे कुठला निर्णय घेणार ते आपल्याला आगामी काळात कळेलच परंतु अनेक राजकीय पक्षांनी आपल्याकडे यावं यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला आहे. निवडणुकीच्या काळात भाजप सारख्या सत्ताधारी पक्षाच्या अनेक पदाचा राजीनामा देऊन त्यांनी आपल्या तत्वात तडजोड केली नाही ही त्यांनी खेड तालुक्यात आपली ओळख कायम ठेवली असून खेड तालुक्यातील पलटूराम यांना चांगलीच चपराक दिली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *