डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक संदेश भूमी येथे निर्माण व्हावे यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार…दादाभाऊ अभंग

Share

धुळे: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पदस्पर्श ज्या भूमीला लागला त्या भूमीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक करण्यात येईल असे महाराष्ट्र शासनाने जाहीर करून त्यास मान्यता दिली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर धुळे येथे आले होते व त्यांनी धुळ्यात मुक्काम केला होता म्हणून त्यांचे संदेश भूमी येथे स्मारक करण्यात यावे अशी शासनाकडे मागणी करून या स्मारकाच्या निर्माणासाठी संदेश भूमी संरक्षण व संवर्धन कृती समितीला सर्वोतोपरी सहकार्य करू व आंबेडकरी समाजाने या कार्यासाठी पुढे यावे असे आवाहन भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांनी धुळे येथे केले. संदेश भूमी या ऐतिहासिक भूमीचे संरक्षण व संवर्धन करणारे संदेश भूमी संरक्षण व संवर्धन समितीचे अध्यक्ष आनंद सैंदाने व त्यांच्या सर्व टीमचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या
डॉ. बाबासाहेब आंबेडकर ३१ जुलै १९३७ रोजी कोर्टाच्या कामानिमित्त धुळे येथे आले असता संदेश भुमी (ट्रॅव्हलर्स बंगलो) या ठिकाणी थांबले होते. त्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पावन भूमीत दर वर्षी ३१ जुलै रोजी विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम घेत संदेश मेळाव्याचे आयोजन केले जाते, ३१ जुलै २०२४ रोजी संदेश भुमी येथे सकाळी ९:०० वाजता धम्म ध्वजारोहण व बुद्ध वंदना घेण्यात आली तसेच महार रेजिमेंटच्या माजी सैनिकांच्या वतीने संदेश भूमीला मानवंदना देण्यात आली. सायंकाळी ६:०० वाजता सप्त खंजिरी वादक सत्यपाल महाराज यांचा आंबेडकरी प्रबोधनपर कीर्तनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला, या कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड भैय्यासाहेब विलास जी झाल्टे, प्रमुख पाहुणे मा. दादाभाऊ अभंग, मा. इर्शाद भाई जहागीरदार, मा.सतीश तात्या महाले (धुळे महानगर प्रमुख) मा. डॉ. गौतम शिलवंत, मा. ऍड मधुकरजी भिसे, मा. ऍड. आनंद जी जगदेव, मा. शशिकांत भालेराव, तसेच संदेश भुमी संरक्षण व संवर्धन कृती समिती व डॉ बाबासाहेब आंबेडकर संदेश भूमी बहुउद्देशीय संस्था धुळे चे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सह पुज्य भंन्ते आनंद थेरो, पुज्य भंन्ते एस . आनंद, संदेश भूमी चे अध्यक्ष आनंद सैंदाणे , ॲड.आनंद जगदेव,बाळासाहेब अहिरे, विजय सुर्यवंशी, नाना साळवे, विजय भामरे, आनंदा सोनवणे,शरद वेंदे, विजयराव मोरे, बी.टी अहिरे, राजेंद्र अहिरे भिमराव बोरसे,संजय रणदिवे, रविकांत खंडारे, सिध्दार्थ नेरकर, निखिल पानपाटील दिपक नगराळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आंबेडकरी चळवळीतील पहाडी आवाजाचे शाहीर सुनील थोरात यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *