रिपब्लिकन सेना व दिनदयाळ चौक मित्र मंडळाच्या विद्यमाने डोंबिवलीत भिमोत्सव २०२४ मोठ्या जल्लोषात संपन्न…!

Share

डोंबिवली: सालाबादाप्रमाणे या ही वर्षी रिपब्लिकन सेना व दिनदयाळ चौक मित्र मंडळाच्या विद्यमाने महामानव, क्रांतिसूर्य भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त महापुरुषांच्या विचारांवर आधारित (पुणे प्रस्तुत) संघर्ष भिमरायांचा….सादरकर्ते विशाल ओव्हाळ आणि संच हा भिम बुद्ध गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम दिनदयाळ चौक,डोंबिवली पश्चिम स्टेशन बाहेर,डोंबिवली(प) येथे मोठ्या जल्लोषात पार पाडण्यात आला.झी युवा चॅनलचे ढोलकीच्या तालावर या कार्यक्रमाची प्रथम विजेती ठरलेली लक्ष्मीताई कुडाळकर या कार्यक्रमाच्या खास आकर्षण होत्या.भीम बुध्द गीतांना आपल्या दमदार ढोलकीच्या वादनाने त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष ख्वाजामिया पटेल, तसेच प्रसिद्ध स्तंभलेखक पत्रकार दादाभाऊ अभंग हे उपस्थित होते.तर कार्यक्रमाचे आयोजन रिपब्लिकन सेनेचे ठाणे जिल्हा निमंत्रक/ कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष तसेच दिनदयाळ चौक मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष (पँथर)आनंद नवसागरे तर संयोजक डोंबिवली विधानसभा अध्यक्ष राहुल नवसागरे हे होते.कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून युवराज वाटुरे,कुणाल नाईक,संदीप हेरोडे,निखिल भगत,सचिन खरात,निलेश मोरे,कपिल सोनवणे,राहुल वाव्हळे,सुरेखाताई जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.या वेळेस पत्रकारांशी बोलताना आनंद नवसागरे म्हणाले की,डोंबिवली शहरातील रिपब्लिकन सेना, दिन दयाळ चौक मित्र मंडळ हे वंचितांच्या न्याय हक्कासाठी नेहमीच अग्रेसर राहिलेले आहे.महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी वामनदादा कर्डक यांना उद्देशून जाहीर सभेत भाष्य केले होते की,माझ्या दहा सभेच्या बरोबर चळवळीच्या गायक,शाहीर कलाकारांच एक गाणं हे प्रचंड प्रेरणादायी आहे.त्याच विषयाचा धागा पकडून आम्ही गेली वीस वर्ष दिनदयाळ चौकात कार्यक्रम लावत आहोत.त्यासोबतच या प्रबोधनाच्या कार्यक्रमाच्या अगोदर चौदा एप्रिल रोजी सुद्धा आम्ही “समता संदेश वाहतूक महारॅली”आम्ही संपन्न करत असतो”.तर महाराष्ट्राचे उपाध्यक्ष ख्वाजामिया पटेल यांनी सांगितले की,डोंबिवली ही सांस्कृतिक नागरी आहे,या ठिकाणी महापुरूश्यांच्या विचारांचे प्रबोधनाचे कार्यक्रम होणे ही काळाची गरज आहे.तसेच प्रबोधनाचे कार्य करता करता गोरगरीब सोशीत वंचितांच्या विषयांवर सुद्धा उठाव होणे गरजेचे आहे.आणि हे कार्य आनंद नवसागरे आणि रिपब्लिकन सेना,तसेच दिनदयाळ चौक मित्र मंडळाचे कार्यकर्ते रात्रंदिवस करीत आहेत.”असे म्हणत त्यांनी भिमोत्सव,२०२४ च्या सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास बाबुराव नवसागरे,रुस्तम कांबळे,गौतम सुतार,भिमराव खंदारे,लक्ष्मण हजारे,मिलिंद साळवे, सुरेंद्र ठोके,अर्जुन जाधव,सुभाष शिरसाट,प्रमोद हजारे,अक्षय वाटूडे,लखन पैठणे, बाबासाहेब धबाले,जिजा भाऊ गोंडगे,देवानंद खिल्लारे,सुरेश सावंत,सर्वेश साबळे,गणेश नेरकर,शारदाताई पवार,छबुबाई नवसागरे,ललिता नवसागरे,जिजाबाई पैठने,पुष्पा हजारे,उषा घोरपडे,गंगुबाई सोनवणे,माया केदारे,सुनंदा गरुड, सुनिता सोनवणे,शोभाबाई साबळे मोतनबाई कुवर, देवकाबाई सोनवणे वाह्वाबाई जगताप, यशोदाबाई आंबेकर, चंद्रभागा घोलप, दर्शिका सोनवणे, दीपा चौहान, ताईबाई नेरकर, मिराबाई संदानशिव, मिराबाई नेतकर, यांच्यासह शेकडो कार्यकर्ते, महिला उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *