आंबेडकरी चळवळीला राजकीय यश नक्कीच मिळेल….दादाभाऊ अभंग

Share

मुंबई : ( प्रदीप तांबे, खार) बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक १४९,संघमित्रा महिला मंडळ, लुंबिनी सांस्कृतिक मंडळ व सभासद वर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक २१ सप्टेंबर २०२४ रोजी लुंबिनी बुद्ध विहार नवामळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, खार (पश्चिम) मुंबई-४०००५२ येथे गट “ड”च्या माध्यमातून वर्षावासानिमित्त बारावे पुष्प गुंफण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून प्रसिद्ध स्तंभलेखक,निर्णायक एल्गार चे संपादक, व भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समितीचे अध्यक्ष आदरणीय दादाभाऊ अभंग यांची विशेष उपस्थिती लाभली.
आदरणीय दादाभाऊ अभंग यांनी आंबेडकरी राजकीय चळवळ काल ! आज आणि उद्या या विषयावर मार्गदर्शन केले, आपली राजकीय ताकद काय होती व आपण मुंबई राज्य असताना आपला महापौर केला होता तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी विरोधी पक्ष नेता म्हणून सुद्धा पद भूषविले होते, तसेच २० मार्च १९२७ साली महाड चवदार तळे येथील सत्याग्रह व काळाराम मंदिर सत्याग्रह हा मंदिर प्रवेशासाठी किंवा पाणी पिण्यासाठी असला तरी तो सामाजिक न्याय व समतेसाठी होता. आम्ही जर का हिंदू आहोत तर हिंदू धर्माप्रमाणे आम्हाला का वागणूक मिळत नाही हे दाखवण्यासाठी व कुत्री,मांजरी,डुकरे या गलीच्छ घाणीत लोळणाऱ्या प्राण्यांना पाणी पिण्यास मनाई नव्हती परंतु माणसासारख्या माणसांना पाण्यापासून दूर ठेवले जाते ही असमानता ब्रिटिश राजवटी समोर मांडण्याकरिता सत्याग्रह केले होते, अशा पद्धतीने दादाभाऊ अभंग यांनी सर्वांना माहिती दिली व मार्गदर्शन केले कार्यक्रमाला महिला सभासदांनी जास्तीत जास्त प्रमाणात उपस्थिती दर्शवली.
महिला वर्ग ऊस्तुकतेने व अगदी मंत्र मुग्ध होऊन दादाभाऊ अभंग यांचे मार्गदर्शन ऐकत होते व मध्येच त्यांच्या विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना उत्तरे सुद्धा देत होते, सदर कार्यक्रम हा बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक १४९, संघमित्रा महिला मंडळ, लुबिनी सांस्कृतिक मंडळ व सभासदर्ग तसेच गट “ड” माध्यमातून पार पाडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप पवार यांनी केले तसेच करुणा गायकवाड यांनी अनुमोदन दिले तदनंतर आयु.विद्या गमरे यांनी अध्यक्ष पद स्वीकारले व आदरणीय दादाभाऊ अभंग यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलित करण्याची विनंती केली. कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर शाखेचे अध्यक्ष आद. परेश मोरे, उपाध्यक्ष आद.संतोष तांबे, चिटणीस आद.प्रदिप तांबे, खजिनदार आद. अनिल जाधव, उप खजिनदार आद.अशोक मोरे.महिला मंडळाचे कार्यकर्ते अध्यक्ष आद.प्रियंका मोरे, उपाध्यक्ष आद.प्रतीक्षा मोरे, चिटणीस आद.विद्या गमरे, ऊप चिटणीस आद.ज्योती गमरे, खजिनदार आद.प्रगती जाधव, ज्येष्ठ सल्लागार आद.प्रमिला जाधव,जेष्ठ सल्लागार आद.करुणा गायकवाड, संदेश वाहक आद.नंदा तांबे, खजिनदार तसेच संदेश वाहक आद.सुधाकर तांबे सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष आद. प्रदीप पवार, आद.ऋषी तांबे तसेच सभासद वर्गातून आद.प्रवीण मर्चंडे,आद.जान्हवी मोहिते, आद.जयश्री पवार, आद.संचिता जाधव, आद.स्मिता यादव, आद.तन्वी तांबे आदी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते, कार्यक्रमाच्या शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष आद.विद्याजी गमरे यांनी दादाभाऊ अभंग यांचे आभार व्यक्त केले तसेच त्यांना फुलगुच्छ देऊन संपूर्ण कार्यकारणीच्या वतीने सन्मानित करण्यात आले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *