माजी आमदार रमेश कदम यांनी घेतली शरद पवार यांची भेट

Share

मुंबई: मोहोळ विधानसभा मतदारसंघातील कामाचा माणूस म्हणून ज्यांची संपूर्ण मोहोळ विधानसभा मतदारसंघांमध्ये ख्याती आहे असे माजी आमदार रमेश कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची यशवंतराव चव्हाण केंद्रात दिनांक २४/९/२०२४ रोजी भेट घेतली. माजी आमदार रमेश कदम यांचा मतदारसंघात दांडगा जनसंपर्क असून त्यांचे लोकांमध्ये असलेले काम शरद पवार यांना माहीत आहे. शरद पवार यांनीच २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी दिली होती. यावेळी त्यांना ६२१२० मते मिळाली होती तर भाजपचे संजय क्षीरसागर यांना ५३७५३ मते मिळाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रमेश कदम यांनी भाजपचे संजय क्षीरसागर यांचा ८३६७ मतांनी पराभव केला होता. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ते निवडणुकीच्या प्रचारात नव्हते तरी त्यांना २३५७३ मते मिळाली यावरूनच मतदारसंघात त्यांना मानणारा मोठा मतदार वर्ग आहे. यावेळी पुन्हा आगामी विधानसभा निवडणुकीत माजी आमदार रमेश कदम हे निवडणूक लढवणार आहे व तशी त्यांनी मोहोळ विधानसभा मतदारसंघात तयारी पण केली आहे. माजी आमदार रमेश कदम हे शिवराय, फुले, शाहू,आंबेडकर, आणि अण्णाभाऊ साठे बहुजन चळवळीतील युवा नेतृत्व असून अनेक महामंडळावर त्यांनी चांगली कामे केली आहे. मोहोळ मतदारसंघामध्ये त्यांच्या आमदारकीच्या व आमदार नसताना पण त्यांनी अत्यंत चांगली कामे केली असून प्रत्येक माणसाच्या समस्या सोडवल्या आहेत. रमेश कदम आज माजी आमदार असून सुद्धा मोहोळ विधानसभा मतदारसंघातली अनेक लोक त्यांच्याकडे प्रश्न घेऊन येतात आणि ते त्याच्यावर तात्काळ त्या प्रश्नांना वाचा फोडून न्याय देतात. रमेश कदम यांची कामाचा माणूस अशा प्रकारची ओळख संपूर्ण मोहोळ विधानसभा मतदारसंघात आहेत रमेश कदम यांना जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षातर्फे उमेदवारी भेटली तर ते आमदार यशवंत माने यांचा दारुण पराभव करतील अशा प्रकारची मोहोळ विधानसभा मतदार मध्ये चर्चा आहे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार काय निर्णय घेतात याकडे मोहोळ सह राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. माजी आमदार रमेश कदम हे आगामी विधानसभा निवडणुक लढणार आणि त्यांनी निवडणूक न लढवण्याचा विचार केला तरी मोहोळ मधील जनता त्यांना निवडणुकीत शंभर टक्के उतरवतील कारण २०१९ ची विधानसभा निवडणुकीच्या वेळी माजी आमदार रमेश कदम नव्हते तरी त्यांचा उमेदवारी अर्ज मोहळच्या जनतेने भरला आणि गावोगावी प्रचार केला होता. यावेळी तर माजी आमदार रमेश कदम स्वतः निवडणुकीच्या काळात हजर आहे म्हणजे त्यांचा विजय निश्चित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *